Acts 1:16 in Marathi 16 बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
Other Translations King James Version (KJV) Men and brethren, this scripture must needs have been fulfilled, which the Holy Ghost by the mouth of David spake before concerning Judas, which was guide to them that took Jesus.
American Standard Version (ASV) Brethren, it was needful that the Scripture should be fulfilled, which the Holy Spirit spake before by the mouth of David concerning Judas, who was guide to them that took Jesus.
Bible in Basic English (BBE) My brothers, the word of God had to be put into effect, which the Holy Spirit had said before, by the mouth of David, about Judas, who was guide to those who took Jesus,
Darby English Bible (DBY) Brethren, it was necessary that the scripture should have been fulfilled, which the Holy Spirit spoke before, by the mouth of David, concerning Judas, who became guide to those who took Jesus;
World English Bible (WEB) "Brothers, it was necessary that this Scripture should be fulfilled, which the Holy Spirit spoke before by the mouth of David concerning Judas, who was guide to those who took Jesus.
Young's Literal Translation (YLT) `Men, brethren, it behoved this Writing that it be fulfilled that beforehand the Holy Spirit spake through the mouth of David, concerning Judas, who became guide to those who took Jesus,
Cross Reference Matthew 26:47 in Marathi 47 येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.
Matthew 26:54 in Marathi 54 परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?
Matthew 26:56 in Marathi 56 परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
Mark 12:36 in Marathi 36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यत, तू माझ्या उजवीकडे बैस.”
Mark 14:43 in Marathi 43 आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक - यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
Luke 22:47 in Marathi 47 तो बोलत असतानाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
John 10:35 in Marathi 35 ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,
John 12:38 in Marathi 38 हे ह्यासाठी झाले की,यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?’
John 13:18 in Marathi 18 “मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुध्द आपली टाच उचलली’, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.
John 18:2 in Marathi 2 ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाहि माहीत होती. कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.
John 19:28 in Marathi 28 मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे.”असे म्हटले.
John 19:36 in Marathi 36 कारण, ‘त्याचे एक हाड मोडणार नाही,’ हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी झाल्या.
Acts 1:20 in Marathi 20 स्तोत्रसहितेत असे लिहिले आहे की त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो. आणि त्याचा हुद्दा दूसरा घेवो.
Acts 2:23 in Marathi 23 तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
Acts 2:29 in Marathi 29 बंधुजनहो, कुलाधिपति दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यत आपल्यामध्ये आहे.
Acts 2:37 in Marathi 37 हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनहो, आम्ही काय करावे?
Acts 4:25 in Marathi 25 तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याव्दारे तू म्हटले की, राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?
Acts 7:2 in Marathi 2 तेव्हा तो म्हणालाः बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता “गौरवशाली देवाने”त्याला दर्शन देऊन म्हटले,
Acts 13:15 in Marathi 15 तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविलाः “बंधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही बोधवचन सांगा.
Acts 13:26 in Marathi 26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली.
Acts 13:38 in Marathi 38 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते.
Acts 15:7 in Marathi 7 तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला ः बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली;
Acts 15:13 in Marathi 13 मग त्यांचे भाषण सपंल्यावर याकोब म्हणाला ; बंधुजनहो, माझे ऐका.
Acts 22:1 in Marathi 1 बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका.
Acts 23:1 in Marathi 1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टि करून म्हणाला, बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.
Acts 23:6 in Marathi 6 तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे .
Acts 28:17 in Marathi 17 तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुध्द मी काहीही केलेले नाही. तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि
Acts 28:25 in Marathi 25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या व्दारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होताः
Hebrews 3:7 in Marathi 7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
2 Peter 2:21 in Marathi 21 कारण, त्यांना नीतिमत्वाचा मार्ग समजल्ययावर, त्यांनी दिलेली पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे, हे होण्यापेक्षा, त्यांना त्याचे ज्ञान झाले नसते तर त्यांच्यासाठी ते बरे झाले असते.