Acts 1:13 in Marathi 13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय,अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते तिथे गेले;
Other Translations King James Version (KJV) And when they were come in, they went up into an upper room, where abode both Peter, and James, and John, and Andrew, Philip, and Thomas, Bartholomew, and Matthew, James the son of Alphaeus, and Simon Zelotes, and Judas the brother of James.
American Standard Version (ASV) And when they were come in, they went up into the upper chamber, where they were abiding; both Peter and John and James and Andrew, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James `the son' of Alphaeus, and Simon the Zealot, and Judas `the son' of James.
Bible in Basic English (BBE) And when they came in, they went up into the room where they were living; Peter and John and James and Andrew, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James, the son of Alphaeus, and Simon the Zealot, and Judas, the son of James.
Darby English Bible (DBY) And when they were come into [the city], they went up to the upper chamber, where were staying both Peter, and John, and James, and Andrew, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James [son] of Alphaeus, and Simon the zealot, and Jude [the brother] of James.
World English Bible (WEB) When they had come in, they went up into the upper room, where they were staying; that is Peter, John, James, Andrew, Philip, Thomas, Bartholomew, Matthew, James the son of Alphaeus, Simon the Zealot, and Judas the son of James.
Young's Literal Translation (YLT) and when they came in, they went up to the upper room, where were abiding both Peter, and James, and John, and Andrew, Philip, and Thomas, Bartholomew, and Matthew, James, of Alphaeus, and Simon the Zelotes, and Judas, of James;
Cross Reference Matthew 4:18 in Marathi 18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
Matthew 9:9 in Marathi 9 मग येशू तेथून पुढे निघाला, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
Matthew 10:2 in Marathi 2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)आणि त्याचा भाऊ अंद्रिया,जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
Mark 2:14 in Marathi 14 नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्या मागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.
Mark 3:16 in Marathi 16 मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले.
Mark 5:37 in Marathi 37 त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही.
Mark 9:2 in Marathi 2 सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले.
Mark 14:15 in Marathi 15 आणि तो तुम्हाला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.”
Mark 14:33 in Marathi 33 येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले.
Luke 5:27 in Marathi 27 या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे ये!
Luke 6:13 in Marathi 13 जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना 'प्रेषित' असे नाव दिले.
Luke 22:12 in Marathi 12 तो मनुष्य तुम्हाला माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.”
John 1:40 in Marathi 40 योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.
John 6:5 in Marathi 5 तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण ह्या लोकांना खायला भाकरी कोठून विकत आणणार?”
John 11:16 in Marathi 16 मग ज्याला दिदुम म्हणत तो थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यांना म्हणाला, “आपणहि ह्याच्याबरोबर मरावयास जाऊ या; ”
John 12:21 in Marathi 21 त्यांनी गालीलांतील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
John 13:23 in Marathi 23 तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता.
John 14:8 in Marathi 8 फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला तेवढें पुरें आहे.”
John 18:17 in Marathi 17 ह्यावरून ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही ह्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.”
John 18:25 in Marathi 25 शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्याला इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”
John 20:26 in Marathi 26 आणि पुन्हा, आठ दिवसांनी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दारे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला, आणि म्हणाला, “तुम्हाला शांती असो.”
John 21:2 in Marathi 2 शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालिलातील काना येथील नथनेल व जब्दीचे पुत्र, आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 2:14 in Marathi 14 तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला ,अहो यहूदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
Acts 3:1 in Marathi 1 आणि पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस, नवव्या ताशी वर मंदिरात जात होते.
Acts 4:13 in Marathi 13 तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत हे जाणून, त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले,.
Acts 4:19 in Marathi 19 परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
Acts 8:14 in Marathi 14 यरूशलेमामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले.
Acts 9:32 in Marathi 32 मग असे झाले की, पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते, त्यांना भेटला.
Acts 10:9 in Marathi 9 दुसऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती. त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.
Acts 12:2 in Marathi 2 योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले.
Acts 12:17 in Marathi 17 पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला
Acts 15:7 in Marathi 7 तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला ः बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली;
Acts 15:13 in Marathi 13 मग त्यांचे भाषण सपंल्यावर याकोब म्हणाला ; बंधुजनहो, माझे ऐका.
Acts 20:8 in Marathi 8 वरच्यामजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.
1 Corinthians 15:7 in Marathi 7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
Galatians 1:19 in Marathi 19 पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही.
Galatians 2:9 in Marathi 9 आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहो हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.
James 1:1 in Marathi 1 देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर पांगलेले आहेत त्यांना नमस्कार .
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
2 John 1:1 in Marathi 1 वडिलांकडून, देवाने निवडलेली बाई व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो, आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुध्दा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Revelation 1:1 in Marathi 1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ते देवाने त्याला, a ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी, दिले आहे, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळवण्यास सांगितले.