2 Timothy 3:8 in Marathi 8 यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
Other Translations King James Version (KJV) Now as Jannes and Jambres withstood Moses, so do these also resist the truth: men of corrupt minds, reprobate concerning the faith.
American Standard Version (ASV) And even as Jannes and Jambres withstood Moses, so do these also withstand the truth. Men corrupted in mind, reprobate concerning the faith.
Bible in Basic English (BBE) And as James and Jambres went against Moses, so do these go against what is true: men of evil minds, who, tested by faith, are seen to be false.
Darby English Bible (DBY) Now in the same manner in which Jannes and Jambres withstood Moses, thus these also withstand the truth; men corrupted in mind, found worthless as regards the faith.
World English Bible (WEB) Even as Jannes and Jambres opposed Moses, so do these also oppose the truth; men corrupted in mind, reprobate concerning the faith.
Young's Literal Translation (YLT) and, even as Jannes and Jambres stood against Moses, so also these do stand against the truth, men corrupted in mind, disapproved concerning the faith;
Cross Reference Acts 8:21 in Marathi 21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.
Acts 13:8 in Marathi 8 परंतु अलीम जादूगार(त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे.)हा बर्णबा व शौल यांच्या विरुध्द होता. राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
Acts 15:24 in Marathi 24 आमच्यापैकी काहीनां जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते;
Romans 1:28 in Marathi 28 आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
2 Corinthians 11:13 in Marathi 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत
2 Corinthians 13:5 in Marathi 5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही , म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
Galatians 1:7 in Marathi 7 ती दुसरी नाही; पण तुम्हाला कोणी तरी घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताची सुवार्ता चुकीची करण्याची त्यांची इच्छा आहे.
Galatians 2:4 in Marathi 4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
2 Thessalonians 2:9 in Marathi 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अदभूते करीत येईल
1 Timothy 1:19 in Marathi 19 आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले.
1 Timothy 4:2 in Marathi 2 ज्या माणसांची सदसदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्या कडे लक्ष देेतील.
1 Timothy 6:5 in Marathi 5 मन बिघडलेल्या, व खरेपण विरहित झालेल्या ,भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची सतत भांडणे होतात,त्यांच्या पासून दूर राहा.
2 Timothy 4:15 in Marathi 15 त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर. कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
Titus 1:10 in Marathi 10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. ,
Titus 1:16 in Marathi 16 ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्याला नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे, आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
1 John 2:18 in Marathi 18 माझ्या लहान मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत;ह्यावरून आपल्याला दिसून येते की,ही शेवटली घटका आहे.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
Jude 1:18 in Marathi 18 त्यांनी तुम्हाला म्हटले होते की, ‘शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील’.
Revelation 2:6 in Marathi 6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा कृत्यांचा व्देष करतेस, मीही त्यांच्या कृत्यांचा व्देष करतो.
Revelation 2:14 in Marathi 14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
Revelation 2:20 in Marathi 20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.