2 Timothy 3:2 in Marathi 2 लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ,निंदा करणारी, आईवडिलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक
Other Translations King James Version (KJV) For men shall be lovers of their own selves, covetous, boasters, proud, blasphemers, disobedient to parents, unthankful, unholy,
American Standard Version (ASV) For men shall be lovers of self, lovers of money, boastful, haughty, railers, disobedient to parents, unthankful, unholy,
Bible in Basic English (BBE) For men will be lovers of self, lovers of money, uplifted in pride, given to bitter words, going against the authority of their fathers, never giving praise, having no religion,
Darby English Bible (DBY) for men shall be lovers of self, lovers of money, boastful, arrogant, evil speakers, disobedient to parents, ungrateful, profane,
World English Bible (WEB) For men will be lovers of self, lovers of money, boastful, arrogant, blasphemers, disobedient to parents, unthankful, unholy,
Young's Literal Translation (YLT) for men shall be lovers of themselves, lovers of money, boasters, proud, evil-speakers, to parents disobedient, unthankful, unkind,
Cross Reference Matthew 15:6 in Marathi 6 ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
Mark 7:11 in Marathi 11 परंतु तुम्ही शिकविता,'' एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की तुम्हाला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला देईल.''
Luke 12:15 in Marathi 15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतः:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
Luke 16:14 in Marathi 14 मग ते परूशी धनाचे लोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला.
Acts 5:36 in Marathi 36 कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणी तरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली, तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.
Romans 1:29 in Marathi 29 ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे,
Romans 11:18 in Marathi 18 तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस. आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे.
Romans 15:1 in Marathi 1 म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
2 Corinthians 5:15 in Marathi 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
Philippians 2:21 in Marathi 21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात,ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
2 Thessalonians 2:4 in Marathi 4 तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरांत बसणारा असा आहे.
1 Timothy 1:20 in Marathi 20 त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.
1 Timothy 3:3 in Marathi 3 तो मद्य पिणारा किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा तर तो सौम्य, न भांडणारा,पैशाचा लोभ न धरणारा.
1 Timothy 6:4 in Marathi 4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.
1 Timothy 6:10 in Marathi 10 कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.
2 Timothy 3:4 in Marathi 4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली , देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील;
James 2:8 in Marathi 8 खरोखर, ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर’, ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहा.
James 4:6 in Marathi 6 पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, ‘देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो’.
James 4:16 in Marathi 16 आता, तुम्ही आपल्या प्रौढीचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे.
1 Peter 5:5 in Marathi 5 तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा. आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.
2 Peter 2:3 in Marathi 3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
2 Peter 2:12 in Marathi 12 पण जे निर्बुध्द प्राणी, नैसर्गिकरीत्या, धरले जाण्यास व मारले जाण्यास जन्मास येतात त्याच्याप्रमाणे हे स्वतःला न समजणार्या गोष्टींविषयी वाईट बोलतात; आणि स्वतःच्या भ्रष्टतेत नाश पावतील.
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
2 Peter 2:18 in Marathi 18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.
Jude 1:10 in Marathi 10 परंतु हे लोक ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टींविषयी वाईट बोलतात. पण त्यांना निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे, नैसर्गिक रीत्या ज्या गोष्टी समजतात त्याद्वारे ते स्वतःचाच नाश करतात.
Jude 1:16 in Marathi 16 ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट आपल्या वाट्याला दोष लावणारे व आपल्या वासनांप्रमाणे चालतात. ते तोंडाने ते फुशारकी करतात व आपल्या लाभासाठी ते मनुष्यांची वाहवा करतात.
Revelation 13:1 in Marathi 1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुगुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
Revelation 13:5 in Marathi 5 आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्याला हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता.
Revelation 16:9 in Marathi 9 लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी ह्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली, आणि त्याला गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
Revelation 16:11 in Marathi 11 त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीच्या देवाची निंदा केली, आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.
Revelation 16:21 in Marathi 21 आणि एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.
Revelation 18:12 in Marathi 12 सोन्याचा, रुप्याचा, हिर्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड, आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे, आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे,