2 Timothy 3:11 in Marathi 11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
Other Translations King James Version (KJV) Persecutions, afflictions, which came unto me at Antioch, at Iconium, at Lystra; what persecutions I endured: but out of them all the Lord delivered me.
American Standard Version (ASV) persecutions, sufferings. What things befell me at Antioch, at Iconium, at Lystra; what persecutions I endured. And out of them all the Lord delivered me.
Bible in Basic English (BBE) My punishments and pain; the things which came to me at Antioch, at Iconium, at Lystra; the cruel attacks made on me: and the Lord made me free from them all.
Darby English Bible (DBY) persecutions, sufferings: what [sufferings] happened to me in Antioch, in Iconium, in Lystra; what persecutions I endured; and the Lord delivered me out of all.
World English Bible (WEB) persecutions, and sufferings: those things that happened to me at Antioch, Iconium, and Lystra. I endured those persecutions. Out of them all the Lord delivered me.
Young's Literal Translation (YLT) the persecutions, the afflictions, that befel me in Antioch, in Iconium, in Lystra; what persecutions I endured, and out of all the Lord did deliver me,
Cross Reference Acts 9:16 in Marathi 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
Acts 9:23 in Marathi 23 काही दिवसानंतर यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
Acts 13:14 in Marathi 14 पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले. आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
Acts 13:45 in Marathi 45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुध्द वाद उपस्थित केला.
Acts 13:50 in Marathi 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुध्द अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
Acts 14:1 in Marathi 1 पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा अशारीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
Acts 14:5 in Marathi 5 काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
Acts 14:19 in Marathi 19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
Acts 20:19 in Marathi 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली.
Acts 20:23 in Marathi 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो
Acts 21:32 in Marathi 32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
Acts 23:10 in Marathi 10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
Acts 23:12 in Marathi 12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबध्द होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.
Acts 25:3 in Marathi 3 आणि, कृपा करून त्याला यरूशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.
Acts 26:17 in Marathi 17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
Acts 26:22 in Marathi 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. “जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.”
Romans 8:35 in Marathi 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?
1 Corinthians 4:9 in Marathi 9 कारण मला वाटते की देवाने आम्हाला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जणु तमाशा असे झालो आहोत.
2 Corinthians 1:8 in Marathi 8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तिपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुध्दा सोडून दिली होती.
2 Corinthians 4:8 in Marathi 8 आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही,आम्ही गोधळलेलो आहोत,पण निराश झालो नाही.
2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
2 Timothy 4:7 in Marathi 7 मी सुयुध्द केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
2 Timothy 4:17 in Marathi 17 प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी. आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.
Hebrews 10:33 in Marathi 33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.
2 Peter 2:9 in Marathi 9 तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.