2 Timothy 2:19 in Marathi 19 तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे .”
Other Translations King James Version (KJV) Nevertheless the foundation of God standeth sure, having this seal, The Lord knoweth them that are his. And, Let every one that nameth the name of Christ depart from iniquity.
American Standard Version (ASV) Howbeit the firm foundation of God standeth, having this seal, The Lord knoweth them that are his: and, Let every one that nameth the name of the Lord depart from unrighteousness.
Bible in Basic English (BBE) But God's strong base is unchanging, having this sign, The Lord has knowledge of those who are his: and, Let everyone by whom the name of the Lord is named be turned away from evil.
Darby English Bible (DBY) Yet the firm foundation of God stands, having this seal, [The] Lord knows those that are his; and, Let every one who names the name of [the] Lord withdraw from iniquity.
World English Bible (WEB) However God's firm foundation stands, having this seal, "The Lord knows those who are his," and, "Let every one who names the name of the Lord{TR reads "Christ" instead of "the Lord"} depart from unrighteousness."
Young's Literal Translation (YLT) sure, nevertheless, hath the foundation of God stood, having this seal, `The Lord hath known those who are His,' and `Let him depart from unrighteousness -- every one who is naming the name of Christ.'
Cross Reference Matthew 7:23 in Marathi 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हाला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
Matthew 7:25 in Marathi 25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Matthew 28:19 in Marathi 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
Mark 13:22 in Marathi 22 कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
Luke 6:48 in Marathi 48 तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते.
Luke 13:27 in Marathi 27 आणि तो तुम्हाला म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, दुष्टपणा करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा
John 10:14 in Marathi 14 मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो, आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.
John 10:27 in Marathi 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.
John 13:18 in Marathi 18 “मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुध्द आपली टाच उचलली’, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.
Acts 9:14 in Marathi 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी मुख्य याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
Acts 11:26 in Marathi 26 जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
Acts 15:17 in Marathi 17 हयासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे
Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
Romans 8:31 in Marathi 31 मग ह्या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?
Romans 9:11 in Marathi 11 आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे, काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून, कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे,
Romans 11:2 in Marathi 2 देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने सोडले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,
Romans 12:9 in Marathi 9 प्रीती निष्कपट असावी. वाइटापासून दूर रहा; चांगल्याला बिलगून रहा.
Romans 15:9 in Marathi 9 आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे. कारण असे लिहिले आहे की, ‘म्हणून, मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
Romans 15:20 in Marathi 20 पण दुसर्याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी, मी सुवार्ता सांगण्यास झटलो.
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
1 Corinthians 3:10 in Marathi 10 आणि देवाच्या कृपेने जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत. ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
1 Corinthians 8:3 in Marathi 3 पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्याला देव ओळखतो.
2 Corinthians 7:1 in Marathi 1 प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुध्देपासून स्वतःला शुध्द करू, आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
Galatians 4:9 in Marathi 9 पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना, किंवा देव तुम्हाला ओळखीत असताना, तुम्ही त्या दुर्बळ, व निसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता?
Ephesians 2:20 in Marathi 20 “तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. “
Ephesians 4:17 in Marathi 17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
Ephesians 4:30 in Marathi 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.
Ephesians 5:1 in Marathi 1 तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
1 Timothy 6:19 in Marathi 19 जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतः साठी करावा.
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
Hebrews 11:10 in Marathi 10 कारण, ज्याचा कारागीर व बांधणारा देव आहे अशा नगराची ते प्रतीक्षा करीत होते.
1 Peter 1:13 in Marathi 13 म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा; आणि, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.
2 Peter 3:14 in Marathi 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
1 John 2:19 in Marathi 19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते;त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.
1 John 3:7 in Marathi 7 प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराहि न्यायसंपन्न आहे.
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 3:8 in Marathi 8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.
Revelation 17:8 in Marathi 8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता, आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल. आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील. कारण तो होता, नाही, आणि येणार आहे.
Revelation 21:14 in Marathi 14 आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकर्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.
Revelation 22:4 in Marathi 4 आणि ते त्याचे मुख पाहतील. व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.