2 Timothy 2:15 in Marathi 15 देवाला पटलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
Other Translations King James Version (KJV) Study to shew thyself approved unto God, a workman that needeth not to be ashamed, rightly dividing the word of truth.
American Standard Version (ASV) Give diligence to present thyself approved unto God, a workman that needeth not to be ashamed, handling aright the word of truth.
Bible in Basic English (BBE) Let it be your care to get the approval of God, as a workman who has no cause for shame, giving the true word in the right way.
Darby English Bible (DBY) Strive diligently to present thyself approved to God, a workman that has not to be ashamed, cutting in a straight line the word of truth.
World English Bible (WEB) Give diligence to present yourself approved by God, a workman who doesn't need to be ashamed, properly handling the Word of Truth.
Young's Literal Translation (YLT) be diligent to present thyself approved to God -- a workman irreproachable, rightly dividing the word of the truth;
Cross Reference Matthew 13:52 in Marathi 52 तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्या माणसासारखा आहे.
Mark 4:33 in Marathi 33 असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे.
Luke 12:42 in Marathi 42 तेव्हा प्रभू म्हणाला, प्रभू त्याच्या इतर चाकरांना त्यांचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा शहाणा व विश्वासू कारभारी कोण आहे?
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 2:22 in Marathi 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याव्दारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता , ह्याची तुम्हाला माहिती आहे.
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Romans 14:18 in Marathi 18 कारण, जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला संतोष देणारा व माणसांनी पारखलेला होतो.
Romans 16:10 in Marathi 10 ख्रिस्तात पारखलेला अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या.
1 Corinthians 2:6 in Marathi 6 जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, परंतु ते ज्ञान ह्या जगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
1 Corinthians 3:1 in Marathi 1 बंधूंनो आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.
2 Corinthians 3:6 in Marathi 6 त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण आत्म्याद्वारे केलेला आहे; कारण लेख मारून टाकतो, पण आत्मा जीवंत करतो.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
2 Corinthians 5:9 in Marathi 9 म्हणून आम्ही झटत आहो, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
2 Corinthians 6:3 in Marathi 3 ह्या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.
2 Corinthians 10:18 in Marathi 18 कारण स्वतःची प्रशंसा करणारा पसंतीस उतरत नाही, पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच पसंतीस उतरतो.
Galatians 1:10 in Marathi 10 मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय?मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
Ephesians 1:13 in Marathi 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
1 Thessalonians 2:4 in Marathi 4 तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही माणसांना खूष करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूष होईल तसे बोलतो.
1 Thessalonians 5:14 in Marathi 14 आता बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
1 Timothy 4:6 in Marathi 6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 5:11 in Marathi 11 याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हाला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहा.
James 1:18 in Marathi 18 आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
2 Peter 1:10 in Marathi 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे पतन कधीही होणार नाही.
2 Peter 1:15 in Marathi 15 आणि माझे निर्गमन झाल्यानंतरहि ह्या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन.
2 Peter 3:14 in Marathi 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.