2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
Other Translations King James Version (KJV) Who hath saved us, and called us with an holy calling, not according to our works, but according to his own purpose and grace, which was given us in Christ Jesus before the world began,
American Standard Version (ASV) who saved us, and called us with a holy calling, not according to our works, but according to his own purpose and grace, which was given us in Christ Jesus before times eternal,
Bible in Basic English (BBE) Who gave us salvation, marking us out for his purpose, not on account of our works, but in the measure of his purpose and his grace, which was given to us in Christ Jesus before times eternal,
Darby English Bible (DBY) who has saved us, and has called us with a holy calling, not according to our works, but according to [his] own purpose and grace, which [was] given to us in Christ Jesus before [the] ages of time,
World English Bible (WEB) who saved us and called us with a holy calling, not according to our works, but according to his own purpose and grace, which was given to us in Christ Jesus before times eternal,
Young's Literal Translation (YLT) who did save us, and did call with an holy calling, not according to our works, but according to His own purpose and grace, that was given to us in Christ Jesus, before the times of the ages,
Cross Reference Matthew 1:21 in Marathi 21 ती पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव,अाणि तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील ,”
Matthew 11:25 in Marathi 25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुध्दीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
Luke 10:21 in Marathi 21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुध्दीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
John 6:37 in Marathi 37 पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्याला मी कधीच घालवणार नाही.
John 10:28 in Marathi 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.
John 17:9 in Marathi 9 त्यांच्यासाठी मी विनंती करतो,मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
John 17:24 in Marathi 24 हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की,जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.
Acts 2:47 in Marathi 47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.
Acts 15:18 in Marathi 18 हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो ,
Romans 3:20 in Marathi 20 कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
Romans 9:11 in Marathi 11 आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे, काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून, कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे,
Romans 9:24 in Marathi 24 त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.
Romans 11:5 in Marathi 5 मग त्याचप्रमाणे ह्या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.
1 Corinthians 1:18 in Marathi 18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
1 Corinthians 3:21 in Marathi 21 म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
Ephesians 1:3 in Marathi 3 स्वर्गीय स्थानातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवाला व पित्याला धन्यवाद असोत.
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 1:11 in Marathi 11 ख्रिस्तामध्ये आम्ही पूर्वीच देवाचे लोक म्हणून त्याच्या योजनेप्रमाणे निवडून नेमले गेलो. जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Ephesians 2:8 in Marathi 8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे देवापासूनचे दान आहे,
Ephesians 3:11 in Marathi 11 देवाच्या सर्वकालच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले.
1 Thessalonians 4:7 in Marathi 7 कारण देवाने आपल्याला अशुध्दपणासाठी नव्हे तर तुम्हास पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
1 Timothy 1:1 in Marathi 1 देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून
Titus 1:2 in Marathi 2 जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने अनंतकाळापूर्वी देऊ केले, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
Hebrews 3:1 in Marathi 1 म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहो, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा प्रमुख याजक आहे.
1 Peter 1:15 in Marathi 15 परंतु तुम्हाला ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 Peter 2:20 in Marathi 20 पण, तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हाला ठोसे दिले गेले, आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यात काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे.
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
Revelation 17:8 in Marathi 8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता, आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल. आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील. कारण तो होता, नाही, आणि येणार आहे.