2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
Other Translations King James Version (KJV) For the which cause I also suffer these things: nevertheless I am not ashamed: for I know whom I have believed, and am persuaded that he is able to keep that which I have committed unto him against that day.
American Standard Version (ASV) For which cause I suffer also these things: yet I am not ashamed; for I know him whom I have believed, and I am persuaded that he is able to guard that which I have committed unto him against that day.
Bible in Basic English (BBE) And for which I undergo these things: but I have no feeling of shame. For I have knowledge of him in whom I have faith, and I am certain that he is able to keep that which I have given into his care till that day.
Darby English Bible (DBY) For which cause also I suffer these things; but I am not ashamed; for I know whom I have believed, and am persuaded that he is able to keep for that day the deposit I have entrusted to him.
World English Bible (WEB) For this cause I suffer also these things. Yet I am not ashamed, for I know him whom I have believed, and I am persuaded that he is able to guard that which I have committed to him against that day.
Young's Literal Translation (YLT) for which cause also these things I suffer, but I am not ashamed, for I have known in whom I have believed, and have been persuaded that he is able that which I have committed to him to guard -- to that day.
Cross Reference Matthew 7:22 in Marathi 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भुते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’
Matthew 12:21 in Marathi 21 परराष्ट्रीय त्याच्यावर आशा ठेवतील.” येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.
Matthew 24:36 in Marathi 36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी पित्यशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही, किंवा खुद्द पुत्रही जाणत नाही.
Luke 10:12 in Marathi 12 मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षां अधिक सोपे जाईल.
Luke 23:46 in Marathi 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, 'पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.'असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
John 6:39 in Marathi 39 आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.
John 6:44 in Marathi 44 ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.
John 10:28 in Marathi 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.
John 17:11 in Marathi 11 आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
John 17:15 in Marathi 15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
Acts 7:59 in Marathi 59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
Acts 9:16 in Marathi 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
Acts 13:50 in Marathi 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुध्द अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
Acts 14:5 in Marathi 5 काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
Acts 21:13 in Marathi 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”
Acts 21:27 in Marathi 27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले.
Acts 22:21 in Marathi 21 तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.
Romans 1:16 in Marathi 16 कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
Romans 5:4 in Marathi 4 आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
Romans 9:33 in Marathi 33 कारण असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
Romans 15:12 in Marathi 12 आणि पुन्हा, यशया म्हणतो की, ‘इशायाला अंकुर फुटेल, आणि, जो परराष्ट्रीयांंवर अधिकार करण्यास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रे आशा ठेवतील.’
1 Corinthians 3:13 in Marathi 13 तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा करील.
Ephesians 1:12 in Marathi 12 ज्या आम्ही ख्रिस्तावर आधीच आशा ठेवली त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.
Ephesians 3:1 in Marathi 1 या कारणासाठी मी, पौल तुम्हा परराष्ट्रीयासाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे. “
Philippians 1:20 in Marathi 20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराव्दारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
Philippians 3:8 in Marathi 8 इतकेच नाही,तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली. आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
Philippians 3:10 in Marathi 10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.
Philippians 3:21 in Marathi 21 तो ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचें नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरिरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
1 Thessalonians 2:16 in Marathi 16 परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो;ते बोलण्याची मनाई करतात; हे ह्यासाठी की,त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत राहावे; त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.
1 Thessalonians 5:4 in Marathi 4 बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
1 Timothy 6:20 in Marathi 20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.
2 Timothy 1:8 in Marathi 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्या प्रमाणे तू माझ्या बरोबर दुःखाचा वाटा घे.
2 Timothy 1:18 in Marathi 18 प्रभू करो आणि त्याला त्या दिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात किती तरी प्रकारें माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2 Timothy 2:9 in Marathi 9 कारण सुवार्तेमुळे मी दुःख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे वचन बांधले गेले नाही.
2 Timothy 3:10 in Marathi 10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे,ही ओळखून आहेस,
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
2 Timothy 4:16 in Marathi 16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुध्द मोजले जाऊ नये.
Hebrews 2:18 in Marathi 18 कारण ज्याअर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दुःदुखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
1 Peter 1:5 in Marathi 5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
1 Peter 4:16 in Marathi 16 ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
1 Peter 4:19 in Marathi 19 म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्या हाती आपले जीव सोपवावेत.
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे