2 Timothy 1:10 in Marathi 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
Other Translations King James Version (KJV) But is now made manifest by the appearing of our Saviour Jesus Christ, who hath abolished death, and hath brought life and immortality to light through the gospel:
American Standard Version (ASV) but hath now been manifested by the appearing of our Saviour Christ Jesus, who abolished death, and brought life and immortality to light through the gospel,
Bible in Basic English (BBE) But has now been made clear by the revelation of our Saviour Christ Jesus, who put an end to death and made life unending come to light through the good news,
Darby English Bible (DBY) but has been made manifest now by the appearing of our Saviour Jesus Christ, who has annulled death, and brought to light life and incorruptibility by the glad tidings;
World English Bible (WEB) but has now been revealed by the appearing of our Savior, Christ Jesus, who abolished death, and brought life and immortality to light through the Gospel.
Young's Literal Translation (YLT) and was made manifest now through the manifestation of our Saviour Jesus Christ, who indeed did abolish death, and did enlighten life and immortality through the good news,
Cross Reference Luke 2:11 in Marathi 11 आज तुमच्या साठी दावीदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे ! तो ख्रिस्त प्रभू आहे.
Luke 2:31 in Marathi 31 ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले.''
Luke 11:36 in Marathi 36 जर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय आहे आणि त्याच्यातील कोणताही भाग अंधकारमय नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुला प्रकाश देतात, तसे ते तुला पूर्णपणे प्रकाशीत करील.”
Luke 13:7 in Marathi 7 म्हणून तो माळ्याला म्हणाला, पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’
John 1:9 in Marathi 9 जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता.
John 4:42 in Marathi 42 आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खरोखर जगाचा तारणारा आहे, हे आम्हाला समजले आहे.”
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 5:40 in Marathi 40 पण तुम्ही आपल्याला जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येऊ इच्छीत नाही.
John 11:25 in Marathi 25 येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 20:31 in Marathi 31 पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Acts 13:23 in Marathi 23 याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 3:31 in Marathi 31 तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.
Romans 5:17 in Marathi 17 कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
Romans 6:6 in Marathi 6 आपण जाणतो की, आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.
Romans 16:26 in Marathi 26 पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे,
1 Corinthians 4:5 in Marathi 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
1 Corinthians 15:26 in Marathi 26 जो शेवटचा शत्रू मृत्यु तो नष्ट केला जाईल.
1 Corinthians 15:53 in Marathi 53 कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे; आणि हे जे मर्त्य आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे.
2 Corinthians 5:4 in Marathi 4 कारण ह्या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मर्त्यपण जीवनात गिळले जावे.
Galatians 5:4 in Marathi 4 नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेला अंतरला आहा,
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 1:18 in Marathi 18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची आशा काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनांत किती आहे,
Colossians 1:26 in Marathi 26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता, त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे.
2 Thessalonians 2:8 in Marathi 8 मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील;
2 Timothy 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
Titus 1:3 in Marathi 3 त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
Hebrews 2:14 in Marathi 14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला,येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
Hebrews 10:32 in Marathi 32 ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
2 Peter 1:3 in Marathi 3 ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या आेळखीच्या द्वारे, त्याच्या आपल्याला, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
2 Peter 1:11 in Marathi 11 आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल.
2 Peter 2:20 in Marathi 20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.
2 Peter 3:2 in Marathi 2 ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची, आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
1 John 1:2 in Marathi 2 ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हाला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हाला प्रकट केले गेले.
1 John 4:14 in Marathi 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे.
Revelation 2:7 in Marathi 7 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
Revelation 18:1 in Marathi 1 ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
Revelation 20:14 in Marathi 14 आणि मृत्यु व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण.
Revelation 22:1 in Marathi 1 नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती. आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.
Revelation 22:14 in Marathi 14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा अधिकार राहील.
Revelation 22:17 in Marathi 17 आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये!” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.