2 Thessalonians 1:9 in Marathi 9 आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून, आणि त्या दिवशी पवित्र जनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
Other Translations King James Version (KJV) Who shall be punished with everlasting destruction from the presence of the Lord, and from the glory of his power;
American Standard Version (ASV) who shall suffer punishment, `even' eternal destruction from the face of the Lord and from the glory of his might,
Bible in Basic English (BBE) Whose reward will be eternal destruction from the face of the Lord and from the glory of his strength,
Darby English Bible (DBY) who shall pay the penalty [of] everlasting destruction from [the] presence of the Lord, and from the glory of his might,
World English Bible (WEB) who will pay the penalty: eternal destruction from the face of the Lord and from the glory of his might,
Young's Literal Translation (YLT) who shall suffer justice -- destruction age-during -- from the face of the Lord, and from the glory of his strength,
Cross Reference Matthew 7:23 in Marathi 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हाला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
Matthew 16:27 in Marathi 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
Matthew 22:13 in Marathi 13 तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, ‘या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.
Matthew 24:30 in Marathi 30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
Matthew 25:41 in Marathi 41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.
Matthew 25:46 in Marathi 46 “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”
Matthew 26:24 in Marathi 24 जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा; पण जो त्याचा विश्वासघात करतो त्याला धिक्कार असो! तो मनुष्य जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.
Mark 9:43 in Marathi 43 जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.
Luke 13:27 in Marathi 27 आणि तो तुम्हाला म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, दुष्टपणा करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा
Luke 16:25 in Marathi 25 परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्याला आराम मिळत आहे व तू दु:खात आहेस.
John 5:14 in Marathi 14 त्यानंतर तो येशूला मंदिरात भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
Philippians 3:19 in Marathi 19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांच्या निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.
1 Thessalonians 5:3 in Marathi 3 “शांती आहे, सुरक्षीतता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.
2 Thessalonians 2:8 in Marathi 8 मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील;
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Hebrews 10:29 in Marathi 29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले,कराराच्या ज्या रक्ताने त्याला पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
2 Peter 2:17 in Marathi 17 ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्याने विखरलेले ढग आहेत, आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.
2 Peter 3:7 in Marathi 7 पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यत राखून ठेवलेली आहेत.
Jude 1:13 in Marathi 13 ते समुद्रावरच्या विक्राळ लाटांसारखे स्वतःची लाज फेसाप्रमाणे वर आणतात. ज्यांच्याकरता, सर्वकाळसाठी निबीड अंधार राखून ठेवलेला आहे असे भटके तारे ते आहेत.
Revelation 14:10 in Marathi 10 तोही देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला , त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकर्यासमोर अग्नीने आणि गंधकाने पीडला जाईल.
Revelation 20:11 in Marathi 11 तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्याला बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाश ही पळून गेली, आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.
Revelation 20:14 in Marathi 14 आणि मृत्यु व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण.
Revelation 21:8 in Marathi 8 पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय. ”
Revelation 22:15 in Marathi 15 परंतु ‘कुत्रे’ चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.