2 Thessalonians 1:11 in Marathi 11 ह्याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या ह्या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
Other Translations King James Version (KJV) Wherefore also we pray always for you, that our God would count you worthy of this calling, and fulfil all the good pleasure of his goodness, and the work of faith with power:
American Standard Version (ASV) To which end we also pray always for you, that our God may count you worthy of your calling, and fulfil every desire of goodness and `every' work of faith, with power;
Bible in Basic English (BBE) For this reason, you are ever in our prayers, that you may seem to our God such as may have a part in his purpose and that by his power he will make all his good purpose, and the work of faith, complete;
Darby English Bible (DBY) To which end we also pray always for you, that our God may count you worthy of the calling, and fulfil all [the] good pleasure of [his] goodness and [the] work of faith with power,
World English Bible (WEB) To this end we also pray always for you, that our God may count you worthy of your calling, and fulfill every desire of goodness and work of faith, with power;
Young's Literal Translation (YLT) for which also we do pray always for you, that our God may count you worthy of the calling, and may fulfil all the good pleasure of goodness, and the work of the faith in power,
Cross Reference Mark 4:28 in Marathi 28 जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.
Luke 12:32 in Marathi 32 “हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे यात पित्याला संतोष वाटतो.
John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
Romans 1:9 in Marathi 9 मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनांत तुमची आठवण करतो;
Romans 8:30 in Marathi 30 आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
1 Corinthians 1:8 in Marathi 8 तोच तुम्हाला शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे.
Ephesians 1:5 in Marathi 5 “देवाच्या प्रीतीच्या योजनेनुसार त्याच्या स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली. त्याने हे यासाठी केले कारण त्याची जी इच्छा होती त्यात तो आनंदित होता.”
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 1:16 in Marathi 16 मी ही तुमच्यासाठी देवाचे आभार मानण्याचे थांबविले नाही आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो.
Ephesians 1:19 in Marathi 19 “आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आेळखून घ्यावे .
Ephesians 3:14 in Marathi 14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
Philippians 1:6 in Marathi 6 आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा भरवसा आहे.
Philippians 1:9 in Marathi 9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
Philippians 2:13 in Marathi 13 कारण इच्छा करणे आणि कार्य करणे ही तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
Philippians 3:14 in Marathi 14 ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
Colossians 1:9 in Marathi 9 म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडू न देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की,तुम्हाला सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुध्दी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
1 Thessalonians 3:9 in Marathi 9 कारण आपल्या देवापुढे, आम्ही तुमच्याकरता, ज्या सर्व आनंदामुळे आनंद करतो त्याबद्दल आम्ही देवाला तुमच्याकरीता काय धन्यवाद देऊ शकणार?
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
2 Thessalonians 2:14 in Marathi 14 त्यांत त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
Hebrews 3:1 in Marathi 1 म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहो, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा प्रमुख याजक आहे.
Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
Revelation 3:4 in Marathi 4 “तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत. ते माझ्याबरोबर पांढऱ्या वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.
Revelation 5:10 in Marathi 10 तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील. ”