2 Peter 2:3 in Marathi 3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
Other Translations King James Version (KJV) And through covetousness shall they with feigned words make merchandise of you: whose judgment now of a long time lingereth not, and their damnation slumbereth not.
American Standard Version (ASV) And in covetousness shall they with feigned words make merchandise of you: whose sentence now from of old lingereth not, and their destruction slumbereth not.
Bible in Basic English (BBE) And in their desire for profit they will come to you with words of deceit, like traders doing business in souls: whose punishment has been ready for a long time and their destruction is watching for them.
Darby English Bible (DBY) And through covetousness, with well-turned words, will they make merchandise of you: for whom judgment of old is not idle, and their destruction slumbers not.
World English Bible (WEB) In covetousness they will exploit you with deceptive words: whose sentence now from of old doesn't linger, and their destruction will not slumber.
Young's Literal Translation (YLT) and in covetousness, with moulded words, of you they shall make merchandise, whose judgment of old is not idle, and their destruction doth not slumber.
Cross Reference Luke 18:8 in Marathi 8 मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरी ही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?.
Luke 20:20 in Marathi 20 तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. आणि त्यांला बोलण्यांत धरून राज्यपालाच्या अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले.
Luke 22:47 in Marathi 47 तो बोलत असतानाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
John 2:16 in Marathi 16 व त्याने कबुतरे विकणार्यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
2 Corinthians 2:17 in Marathi 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
2 Corinthians 12:17 in Marathi 17 मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय?
1 Thessalonians 2:5 in Marathi 5 कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे; तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलाे नाही. देव साक्षी आहे;
1 Thessalonians 5:3 in Marathi 3 “शांती आहे, सुरक्षीतता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.
1 Timothy 3:3 in Marathi 3 तो मद्य पिणारा किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा तर तो सौम्य, न भांडणारा,पैशाचा लोभ न धरणारा.
1 Timothy 3:8 in Marathi 8 त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी, किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
1 Timothy 6:5 in Marathi 5 मन बिघडलेल्या, व खरेपण विरहित झालेल्या ,भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची सतत भांडणे होतात,त्यांच्या पासून दूर राहा.
Titus 1:7 in Marathi 7 अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी,मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;
Titus 1:11 in Marathi 11 त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात, आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
1 Peter 2:8 in Marathi 8 असा देखील शास्त्रलेख आहे ‘अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.’ ते अवमान करून वचनावर अडखळतात. त्यासाठीच ते नेमलेले होते.
1 Peter 5:2 in Marathi 2 तुमच्यामधील, देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने; द्रव्यलोभासाठी नाही, पण उत्सुकतेने; करा
2 Peter 1:16 in Marathi 16 कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे एेश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो.
2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
2 Peter 2:9 in Marathi 9 तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
Jude 1:4 in Marathi 4 कारण, जे ह्या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येक जण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत,त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटुन तिला कामातुर पणाचे स्वरुप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.
Jude 1:7 in Marathi 7 जारकर्मात लोळणारी व परदेहाच्या मागे लागणारी, त्यांच्या आसपासची इतर नगरे, हयांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत.
Jude 1:11 in Marathi 11 त्यांची केवढी दुर्दशा होणार ! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत, आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.
Jude 1:15 in Marathi 15 तो सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांना, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी, आणि भक्तिहीन पाप्यांना, त्याच्याविरुद्ध त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे.’
Revelation 18:11 in Marathi 11 “आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही.