2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
Other Translations King James Version (KJV) But there were false prophets also among the people, even as there shall be false teachers among you, who privily shall bring in damnable heresies, even denying the Lord that bought them, and bring upon themselves swift destruction.
American Standard Version (ASV) But there arose false prophets also among the people, as among you also there shall be false teachers, who shall privily bring in destructive heresies, denying even the Master that bought them, bringing upon themselves swift destruction.
Bible in Basic English (BBE) But there were false prophets among the people, as there will be false teachers among you, who will secretly put forward wrong teachings for your destruction, even turning away from the Lord who gave himself for them; whose destruction will come quickly, and they themselves will be the cause of it.
Darby English Bible (DBY) But there were false prophets also among the people, as there shall be also among you false teachers, who shall bring in by the bye destructive heresies, and deny the master that bought them, bringing upon themselves swift destruction;
World English Bible (WEB) But there also arose false prophets among the people, as among you also there will be false teachers, who will secretly bring in destructive heresies, denying even the Master who bought them, bringing on themselves swift destruction.
Young's Literal Translation (YLT) And there did come also false prophets among the people, as also among you there shall be false teachers, who shall bring in besides destructive sects, and the Master who bought them denying, bringing to themselves quick destruction,
Cross Reference Matthew 7:15 in Marathi 15 “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
Matthew 10:33 in Marathi 33 पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुध्दा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
Matthew 24:5 in Marathi 5 कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवतील.
Matthew 24:11 in Marathi 11 अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील.
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Mark 13:22 in Marathi 22 कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
Luke 6:26 in Marathi 26 'जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हाला दु:ख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.
Luke 12:9 in Marathi 9 परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.
Luke 21:8 in Marathi 8 येशू म्हणाला, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो मी आहे असे म्हणतील. आणि ते म्हणतील, वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!
Acts 3:13 in Marathi 13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
1 Corinthians 6:20 in Marathi 20 कारण तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
1 Corinthians 7:23 in Marathi 23 तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; तुम्ही माणसाचे दास होऊ नका.
1 Corinthians 11:19 in Marathi 19 यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
2 Corinthians 11:13 in Marathi 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत
Galatians 2:4 in Marathi 4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
Galatians 3:13 in Marathi 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला.आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’,असा शास्त्रलेख आहे.
Galatians 4:17 in Marathi 17 ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही. पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हाला आमच्यापासून वेगळे करू पाहतात.
Galatians 5:20 in Marathi 20 मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट,
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Philippians 3:19 in Marathi 19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांच्या निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.
Colossians 2:8 in Marathi 8 तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हाला ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
Colossians 2:18 in Marathi 18 लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्व:ताला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
2 Thessalonians 2:3 in Marathi 3 कोणत्याहि प्रकारे कोणाकडून फसू नका;कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष,नाशाचा पुत्र प्रकट होईल;
1 Timothy 4:1 in Marathi 1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
2 Timothy 2:12 in Marathi 12 जर आम्ही दुःखसहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुध्दा करू जर आम्ही त्याला नाकारले, तर तोही आम्हाला नाकारील
2 Timothy 3:1 in Marathi 1 परंतु शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचा समय आपल्यावर येईल हे समजून घे.
2 Timothy 4:3 in Marathi 3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, .
Titus 1:11 in Marathi 11 त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात, आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
Titus 3:10 in Marathi 10 वितंडवादी मनुष्याला पहिला व दुसरा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव.
Hebrews 10:29 in Marathi 29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले,कराराच्या ज्या रक्ताने त्याला पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
1 Peter 1:8 in Marathi 8 तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता.
2 Peter 2:3 in Marathi 3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
1 John 2:18 in Marathi 18 माझ्या लहान मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत;ह्यावरून आपल्याला दिसून येते की,ही शेवटली घटका आहे.
1 John 2:26 in Marathi 26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
Jude 1:4 in Marathi 4 कारण, जे ह्या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येक जण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत,त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटुन तिला कामातुर पणाचे स्वरुप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.
Jude 1:18 in Marathi 18 त्यांनी तुम्हाला म्हटले होते की, ‘शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील’.
Revelation 2:9 in Marathi 9 “मला तुमचे दु:ख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गाेष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, (पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.)
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 3:8 in Marathi 8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.
Revelation 5:9 in Marathi 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्ट्रांतून विकत घेतले.
Revelation 13:14 in Marathi 14 आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो.