2 Peter 1:17 in Marathi 17 कारण त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा एेश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा प्रिय पुत्र,मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे’.
Other Translations King James Version (KJV) For he received from God the Father honour and glory, when there came such a voice to him from the excellent glory, This is my beloved Son, in whom I am well pleased.
American Standard Version (ASV) For he received from God the Father honor and glory, when there was borne such a voice to him by the Majestic Glory, This is my beloved Son, in whom I am well pleased:
Bible in Basic English (BBE) For God the Father gave him honour and glory, when such a voice came to him out of the great glory, saying, This is my dearly loved Son, with whom I am well pleased.
Darby English Bible (DBY) For he received from God [the] Father honour and glory, such a voice being uttered to him by the excellent glory: This is my beloved Son, in whom *I* have found my delight;
World English Bible (WEB) For he received from God the Father honor and glory, when the voice came to him from the Majestic Glory, "This is my beloved Son, in whom I am well pleased."
Young's Literal Translation (YLT) for having received from God the Father honour and glory, such a voice being borne to him by the excellent glory: `This is My Son -- the beloved, in whom I was well pleased;'
Cross Reference Matthew 3:17 in Marathi 17 आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.
Matthew 11:25 in Marathi 25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुध्दीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
Matthew 12:18 in Marathi 18 “हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो, आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीयांना योग्य न्यायाची घोषणा करील.
Matthew 17:5 in Marathi 5 तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
Mark 1:11 in Marathi 11 तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
Mark 9:7 in Marathi 7 तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
Luke 3:22 in Marathi 22 आणि पवित्र आत्मा देह रूपाने कबुतरा प्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.
Luke 9:34 in Marathi 34 तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला, आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले.
Luke 10:22 in Marathi 22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.
John 3:35 in Marathi 35 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे.
John 5:21 in Marathi 21 कारण पिता जसा मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.
John 5:26 in Marathi 26 कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले.
John 5:36 in Marathi 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिध्दीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
John 6:37 in Marathi 37 पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्याला मी कधीच घालवणार नाही.
John 6:39 in Marathi 39 आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.
John 10:36 in Marathi 36 तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले,त्या मला,मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?
John 12:28 in Marathi 28 हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” तेव्हा आकाशवाणी झाली, ‘मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.’
John 13:1 in Marathi 1 आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, ह्या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
John 20:17 in Marathi 17 येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’”
2 Corinthians 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
2 Corinthians 11:31 in Marathi 31 देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही.
2 John 1:3 in Marathi 3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः