2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
Other Translations King James Version (KJV) Simon Peter, a servant and an apostle of Jesus Christ, to them that have obtained like precious faith with us through the righteousness of God and our Saviour Jesus Christ:
American Standard Version (ASV) Simon Peter, a servant and apostle of Jesus Christ, to them that have obtained a like precious faith with us in the righteousness of our God and `the' Saviour Jesus Christ:
Bible in Basic English (BBE) Simon Peter, a servant and Apostle of Jesus Christ, to those who with us have a part in the same holy faith in the righteousness of our God and Saviour Jesus Christ:
Darby English Bible (DBY) Simon Peter, bondman and apostle of Jesus Christ, to them that have received like precious faith with us through [the] righteousness of our God and Saviour Jesus Christ:
World English Bible (WEB) Simon Peter, a servant and apostle of Jesus Christ, to those who have obtained a like precious faith with us in the righteousness of our God and Savior, Jesus Christ:
Young's Literal Translation (YLT) Simeon Peter, a servant and an apostle of Jesus Christ, to those who did obtain a like precious faith with us in the righteousness of our God and Saviour Jesus Christ:
Cross Reference Matthew 4:18 in Marathi 18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
Matthew 10:2 in Marathi 2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)आणि त्याचा भाऊ अंद्रिया,जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
Luke 1:47 in Marathi 47 आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
Luke 11:49 in Marathi 49 यामुळे देवाचे ज्ञानसुध्दा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
Luke 22:31 in Marathi 31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
John 1:42 in Marathi 42 त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
John 12:26 in Marathi 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.
John 20:21 in Marathi 21 तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हाला पाठवतो.”
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 15:8 in Marathi 8 आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
Acts 15:14 in Marathi 14 परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली , हे शिमोनाने सांगितले आहे;आणि हयाच्याशी संदेष्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 1:12 in Marathi 12 म्हणजे आपल्या एकमेकांच्या तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.
Romans 1:17 in Marathi 17 कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. कारण असा शास्त्रलेख आहे की, नीतिमान विश्वासाने जगेल’.
Romans 3:21 in Marathi 21 पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे.
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
1 Corinthians 9:1 in Marathi 1 मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहा ना?
1 Corinthians 15:9 in Marathi 9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुध्दा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला.
2 Corinthians 4:13 in Marathi 13 मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे.
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
Galatians 2:8 in Marathi 8 कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाहि परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
Ephesians 3:5 in Marathi 5 ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे,तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना सांगण्यात आले नव्हते.
Ephesians 4:5 in Marathi 5 एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,
Ephesians 4:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक,पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.
Philippians 1:29 in Marathi 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे,तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हाला दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
Philippians 3:9 in Marathi 9 आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाव्दारे, म्हणजे देवाकडून विश्वासाव्दारे मिळणारे नीतिमत्व असे असावे.
2 Timothy 1:5 in Marathi 5 तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
Titus 1:1 in Marathi 1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरु तीत ह्यास,सर्वकाळच्या जीवनाच्या आशेकरीता सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी निवडलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल,ह्याच्याकडून:
Titus 1:4 in Marathi 4 देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा ज्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो ह्याच्यापासून कृपा,दया व शांती असो.
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
1 Peter 1:7 in Marathi 7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
1 Peter 2:7 in Marathi 7 म्हणून विश्वास ठेवणार्या तुम्हाला तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्याचा मुख्य कोनशिला झाला आहे’;
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.