2 Corinthians 8:9 in Marathi 9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
Other Translations King James Version (KJV) For ye know the grace of our Lord Jesus Christ, that, though he was rich, yet for your sakes he became poor, that ye through his poverty might be rich.
American Standard Version (ASV) For ye know the grace of our Lord Jesus Christ, that, though he was rich, yet for your sakes he became poor, that ye through his poverty might become rich.
Bible in Basic English (BBE) For you see the grace of our Lord Jesus Christ, how though he had wealth, he became poor on your account, so that through his need you might have wealth.
Darby English Bible (DBY) For ye know the grace of our Lord Jesus Christ, that for your sakes he, being rich, became poor, in order that *ye* by *his* poverty might be enriched.
World English Bible (WEB) For you know the grace of our Lord Jesus Christ, that, though he was rich, yet for your sakes he became poor, that you through his poverty might become rich.
Young's Literal Translation (YLT) for ye know the grace of our Lord Jesus Christ, that because of you he became poor -- being rich, that ye by that poverty may become rich.
Cross Reference Matthew 8:20 in Marathi 20 येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.
Matthew 17:27 in Marathi 27 तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”
Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Mark 6:3 in Marathi 3 जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.
Luke 2:7 in Marathi 7 तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, आणि तिने त्याला फडक्यामध्ये गुंडाळले व गव्हाणींत ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
Luke 8:3 in Marathi 3 हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, ह्या आपल्या द्रव्यानें त्यांची सेवा करीत असत.
Luke 9:58 in Marathi 58 तेव्हा येशू त्याला म्हणाला, खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.
Luke 16:11 in Marathi 11 म्हणून जर तुम्ही जगातील धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील?
John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 1:10 in Marathi 10 तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.
John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
John 1:17 in Marathi 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.
John 12:30 in Marathi 30 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझ्यासाठी ही वाणी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली.
John 16:15 in Marathi 15 जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालों की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हाला कळवील.
John 17:19 in Marathi 19 आणि त्यांनीहि सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरितां स्वतःला पवित्र करतो.
Romans 5:8 in Marathi 8 पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मेला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
Romans 5:20 in Marathi 20 शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.
Romans 8:32 in Marathi 32 आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्याला दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
Romans 11:12 in Marathi 12 आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले, आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?
1 Corinthians 1:4 in Marathi 4 तुम्हाला ख्रिस्त येशूने पुरविलेल्या, देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो.
1 Corinthians 15:47 in Marathi 47 पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.
2 Corinthians 6:10 in Marathi 10 आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले, आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
2 Corinthians 13:14 in Marathi 14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Ephesians 1:6 in Marathi 6 “त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले . ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हाला फुकट दिली. “
Ephesians 2:7 in Marathi 7 “देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या महान कृपेची अपार समृध्दी दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाविषयीची ममता व्यक्त करावी.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Philippians 2:6 in Marathi 6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
Colossians 1:16 in Marathi 16 कारण, स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
Hebrews 1:2 in Marathi 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
Hebrews 1:6 in Marathi 6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्याला नमन करोत.”
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
Revelation 3:18 in Marathi 18 मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुध्द केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील. आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.
Revelation 21:7 in Marathi 7 जो विजय मिळवतो त्याला ह्या सर्व गोष्टी वारशान मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.