2 Corinthians 5:15 in Marathi 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
Other Translations King James Version (KJV) And that he died for all, that they which live should not henceforth live unto themselves, but unto him which died for them, and rose again.
American Standard Version (ASV) and he died for all, that they that live should no longer live unto themselves, but unto him who for their sakes died and rose again.
Bible in Basic English (BBE) And that he underwent death for all, so that the living might no longer be living to themselves, but to him who underwent death for them and came back from the dead.
Darby English Bible (DBY) and he died for all, that they who live should no longer live to themselves, but to him who died for them and has been raised.
World English Bible (WEB) He died for all, that those who live should no longer live to themselves, but to him who for their sakes died and rose again.
Young's Literal Translation (YLT) and for all he died, that those living, no more to themselves may live, but to him who died for them, and was raised again.
Cross Reference Luke 1:74 in Marathi 74 ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रुंच्या हातून सुटून
John 3:15 in Marathi 15 ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 6:57 in Marathi 57 जसे जिवंत पित्याने मला पाठवले, आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.
Romans 6:2 in Marathi 2 कधीच नाही!आपण जे पापाला मेलोत, ते त्यात ह्यापुढे, कसे राहणार?
Romans 6:6 in Marathi 6 आपण जाणतो की, आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.
Romans 6:11 in Marathi 11 तसेच, आपण ख्रिस्त येशूत खरोखर पापाला मेलेले, पण देवाला जिवंत आहोत, असे तुम्ही स्वतःला माना.
Romans 8:2 in Marathi 2 कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.
Romans 8:6 in Marathi 6 कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
Romans 8:10 in Marathi 10 पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मेलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे.
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 14:7 in Marathi 7 कारण, आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.
1 Corinthians 6:19 in Marathi 19 किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?
1 Corinthians 10:33 in Marathi 33 जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
2 Corinthians 3:6 in Marathi 6 त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण आत्म्याद्वारे केलेला आहे; कारण लेख मारून टाकतो, पण आत्मा जीवंत करतो.
2 Corinthians 5:16 in Marathi 16 म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.
Galatians 2:19 in Marathi 19 कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो आहे, ह्यासाठी की,मी देवाकरता जगावे.
Galatians 5:25 in Marathi 25 आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.
Ephesians 4:17 in Marathi 17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
Ephesians 5:14 in Marathi 14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो. म्हणून असे म्हटले आहे “हे झोपलेल्या जागा हो, अाणि मेलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल”.
Philippians 1:20 in Marathi 20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराव्दारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
Colossians 2:12 in Marathi 12 त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यातच त्याच्याबरोबर उठवले गेला,
Colossians 3:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहा तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
Colossians 3:17 in Marathi 17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल,ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
Colossians 3:23 in Marathi 23 आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.
1 Thessalonians 5:10 in Marathi 10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी ह्याकरता मेला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
1 Peter 1:14 in Marathi 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
1 Peter 4:6 in Marathi 6 कारण, ह्याकरता, मृतांनादेखील सुवार्ता सांगण्यात आली होती; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
1 John 4:9 in Marathi 9 देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.