2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
Other Translations King James Version (KJV) In whom the god of this world hath blinded the minds of them which believe not, lest the light of the glorious gospel of Christ, who is the image of God, should shine unto them.
American Standard Version (ASV) in whom the god of this world hath blinded the minds of the unbelieving, that the light of the gospel of the glory of Christ, who is the image of God, should not dawn `upon them'.
Bible in Basic English (BBE) Because the god of this world has made blind the minds of those who have not faith, so that the light of the good news of the glory of Christ, who is the image of God, might not be shining on them.
Darby English Bible (DBY) in whom the god of this world has blinded the thoughts of the unbelieving, so that the radiancy of the glad tidings of the glory of the Christ, who is [the] image of God, should not shine forth [for them].
World English Bible (WEB) in whom the god of this world has blinded the minds of the unbelieving, that the light of the Gospel of the glory of Christ, who is the image of God, should not dawn on them.
Young's Literal Translation (YLT) in whom the god of this age did blind the minds of the unbelieving, that there doth not shine forth to them the enlightening of the good news of the glory of the Christ, who is the image of God;
Cross Reference Matthew 4:8 in Marathi 8 मग सैतानाने येशूला एका अतिशय उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखवले.
John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
John 1:18 in Marathi 18 देवाला कोणीहीं कधीच पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र जन्मलेला पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
John 8:12 in Marathi 12 पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
John 12:31 in Marathi 31 आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.
John 12:35 in Marathi 35 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हाला प्रकाश आहे तोवर चाला; यासाठी, अंधकाराने तुम्हाला गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.
John 12:40 in Marathi 40 ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये,वळू नये व मी त्यांना बरे करू नये.म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे;
John 12:45 in Marathi 45 आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो.
John 14:9 in Marathi 9 येशूने त्याला म्हटले, “ फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हाला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
John 15:24 in Marathi 24 जी कामे दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाहि पाहिले आहे व आमचा व्देष केला आहे.
John 16:11 in Marathi 11 आणि न्यायाविषयी; कारण ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे.
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
1 Corinthians 10:20 in Marathi 20 नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही!
2 Corinthians 3:8 in Marathi 8 तर तिच्यापेक्षा आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?
2 Corinthians 3:11 in Marathi 11 कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
2 Corinthians 3:14 in Marathi 14 पण त्यांची मने कठीण केली गेली, कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.
2 Corinthians 3:18 in Marathi 18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्व जण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
Ephesians 2:2 in Marathi 2 “ज्यामध्ये तुम्ही पूर्वी या जगाच्या चालिरीतीप्रमाणे चालत व रहात होता, आकाशातील राज्याचा अधिकारी जो सैतान, आज्ञा मोडणाऱ्या पुत्रांच्या आत्म्यात कार्य करणाऱ्या अधिपती प्रमाणे चालत होता. . “
Ephesians 6:12 in Marathi 12 कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुध्द, अधिकाऱ्याविरुध्द, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुध्द आहे.
Philippians 2:6 in Marathi 6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
Colossians 1:15 in Marathi 15 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
1 Timothy 1:11 in Marathi 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
2 Peter 1:19 in Marathi 19 शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
1 John 2:8 in Marathi 8 तरीही मी एकप्रकारे नवी आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे, कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
Revelation 20:2 in Marathi 2 आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले,