2 Corinthians 3:6 in Marathi 6 त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण आत्म्याद्वारे केलेला आहे; कारण लेख मारून टाकतो, पण आत्मा जीवंत करतो.
Other Translations King James Version (KJV) Who also hath made us able ministers of the new testament; not of the letter, but of the spirit: for the letter killeth, but the spirit giveth life.
American Standard Version (ASV) who also made us sufficient as ministers of a new covenant; not of the letter, but of the spirit: for the letter killeth, but the spirit giveth life.
Bible in Basic English (BBE) Who has made us able to be servants of a new agreement; not of the letter, but of the Spirit: for the letter gives death, but the Spirit gives life.
Darby English Bible (DBY) who has also made us competent, [as] ministers of [the] new covenant; not of letter, but of spirit. For the letter kills, but the Spirit quickens.
World English Bible (WEB) who also made us sufficient as servants of a new covenant; not of the letter, but of the Spirit. For the letter kills, but the Spirit gives life.
Young's Literal Translation (YLT) who also made us sufficient `to be' ministrants of a new covenant, not of letter, but of spirit; for the letter doth kill, and the spirit doth make alive.
Cross Reference Matthew 13:52 in Marathi 52 तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्या माणसासारखा आहे.
Matthew 26:28 in Marathi 28 कारण हे माझे कराराचे रक्त आहे.हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.
Mark 14:24 in Marathi 24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
Luke 22:20 in Marathi 20 त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.”
John 5:21 in Marathi 21 कारण पिता जसा मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.
John 6:63 in Marathi 63 आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत.
Romans 1:5 in Marathi 5 त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
Romans 2:27 in Marathi 27 आणि, देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?
Romans 3:20 in Marathi 20 कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
Romans 4:15 in Marathi 15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
Romans 4:17 in Marathi 17 (कारण असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’) ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.
Romans 7:6 in Marathi 6 पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्याला आपण मेलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
Romans 7:9 in Marathi 9 कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मेलो.
Romans 8:2 in Marathi 2 कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.
1 Corinthians 3:5 in Marathi 5 तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. जसे प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.
1 Corinthians 3:10 in Marathi 10 आणि देवाच्या कृपेने जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत. ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
1 Corinthians 11:25 in Marathi 25 त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
1 Corinthians 15:45 in Marathi 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत जीव झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला.
2 Corinthians 3:7 in Marathi 7 पण दगडावर कोरलेल्या अक्षरांत लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते,त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती .
2 Corinthians 3:9 in Marathi 9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.
2 Corinthians 3:14 in Marathi 14 पण त्यांची मने कठीण केली गेली, कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.
2 Corinthians 5:18 in Marathi 18 हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली;
Galatians 3:10 in Marathi 10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे’.
Galatians 3:21 in Marathi 21 तर मग नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुध्द आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.
Ephesians 2:1 in Marathi 1 “आणि तुम्ही आपले अपराध आणि पातके यामुळे मेला होता. “
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Ephesians 3:7 in Marathi 7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
Ephesians 4:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक,पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.
Colossians 1:25 in Marathi 25 आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यात मी मंडळीचा सेवक झालो आहे.
1 Timothy 1:11 in Marathi 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
1 Timothy 4:6 in Marathi 6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
2 Timothy 1:11 in Marathi 11 मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
Hebrews 7:22 in Marathi 22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे
Hebrews 8:6 in Marathi 6 परंतु येशू ख्रिस्ताला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनाच्या पायावर उभा आहे.
Hebrews 9:15 in Marathi 15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार सर्वकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावतो, त्यांच्याकरता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
Hebrews 12:24 in Marathi 24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.