2 Corinthians 13:5 in Marathi 5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही , म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
Other Translations King James Version (KJV) Examine yourselves, whether ye be in the faith; prove your own selves. Know ye not your own selves, how that Jesus Christ is in you, except ye be reprobates?
American Standard Version (ASV) Try your own selves, whether ye are in the faith; prove your own selves. Or know ye not as to your own selves, that Jesus Christ is in you? unless indeed ye be reprobate.
Bible in Basic English (BBE) Make a test of yourselves, if you are in the faith; make certain of yourselves. Or are you not conscious in yourselves that Jesus Christ is in you, if you are truly Christ's?
Darby English Bible (DBY) examine your own selves if ye be in the faith; prove your own selves: do ye not recognise yourselves, that Jesus Christ is in you, unless indeed ye be reprobates?
World English Bible (WEB) Test your own selves, whether you are in the faith. Test your own selves. Or don't you know as to your own selves, that Jesus Christ is in you?--unless indeed you are disqualified.
Young's Literal Translation (YLT) Your ownselves try ye, if ye are in the faith; your ownselves prove ye; do ye not know your ownselves, that Jesus Christ is in you, if ye be not in some respect disapproved of?
Cross Reference John 6:6 in Marathi 6 हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार अाहोत हे त्याला ठाऊक होते.
John 6:56 in Marathi 56 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो.
John 14:23 in Marathi 23 येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
John 15:4 in Marathi 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलांत राहिल्यावांचून त्याला आपल्याआपण फळ देतां येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही.
John 17:23 in Marathi 23 म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरहि प्रीती केली.
John 17:26 in Marathi 26 मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यांमध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
Romans 1:28 in Marathi 28 आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Romans 8:10 in Marathi 10 पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मेलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे.
1 Corinthians 3:16 in Marathi 16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही काय?
1 Corinthians 6:2 in Marathi 2 पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहित नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर क्षुल्लक, बाबींचा तुम्ही निर्णय करू शकत नाही काय?
1 Corinthians 6:15 in Marathi 15 तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो.
1 Corinthians 6:19 in Marathi 19 किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?
1 Corinthians 9:24 in Marathi 24 शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की,ते तुम्ही मिळवाल.
1 Corinthians 9:27 in Marathi 27 पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाहीतर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
1 Corinthians 11:28 in Marathi 28 म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी. आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
1 Corinthians 11:31 in Marathi 31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
2 Corinthians 6:16 in Marathi 16 आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहा. कारण देवाने म्हटले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
2 Corinthians 13:6 in Marathi 6 मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल.
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Galatians 4:19 in Marathi 19 माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीवेदना होत आहेत.
Galatians 6:4 in Marathi 4 पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्याला दुसर्याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल.
Ephesians 2:20 in Marathi 20 “तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. “
Ephesians 3:17 in Marathi 17 विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असे असून,
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Colossians 2:7 in Marathi 7 तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हाला शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यात वाढत जा.
Colossians 2:19 in Marathi 19 असा माणूस मस्तकापासून धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वाढ होते.
1 Timothy 2:15 in Marathi 15 तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास व प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
2 Timothy 3:8 in Marathi 8 यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
Titus 1:13 in Marathi 13 ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.
Titus 1:16 in Marathi 16 ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्याला नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे, आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
Titus 2:2 in Marathi 2 त्या अशा की, वृध्द पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे, आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.
Hebrews 4:1 in Marathi 1 म्हणून देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
Hebrews 6:8 in Marathi 8 पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिती असते; तिचा अग्नीने नाश होईल.
Hebrews 12:15 in Marathi 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊन व इतर लोकांची मने अशुध्द करू नये, म्हणून जपा.
James 4:4 in Marathi 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
1 Peter 2:4 in Marathi 4 मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता,
1 Peter 5:9 in Marathi 9 तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुद्ध उभे रहा. कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत.
1 John 3:20 in Marathi 20 कारण जर आपले अंतःकरण आपल्याला दोषी ठरवते, तर आपल्या अंतःकरणापेक्षा देव थोर आहे, आणि तो सर्व काही जाणतो
Revelation 2:5 in Marathi 5 म्हणून तू कोठून पडलीस ह्याची आठवण कर पश्चाताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
Revelation 3:2 in Marathi 2 जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.