2 Corinthians 13:11 in Marathi 11 शेवटी, बंधूंनो आणि बहीणींनो, आनंद करा!तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा; आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
Other Translations King James Version (KJV) Finally, brethren, farewell. Be perfect, be of good comfort, be of one mind, live in peace; and the God of love and peace shall be with you.
American Standard Version (ASV) Finally, brethren, farewell. Be perfected; be comforted; be of the same mind; live in peace: and the God of love and peace shall be with you.
Bible in Basic English (BBE) Let this be my last word, brothers; be glad; be complete; be comforted; be of the same mind; be at peace with one another: and the God of love and peace will be with you.
Darby English Bible (DBY) For the rest, brethren, rejoice; be perfected; be encouraged; be of one mind; be at peace; and the God of love and peace shall be with you.
World English Bible (WEB) Finally, brothers, rejoice. Be perfected, be comforted, be of the same mind, live in peace, and the God of love and peace will be with you.
Young's Literal Translation (YLT) Henceforth, brethren, rejoice; be made perfect, be comforted, be of the same mind, be at peace, and the God of the love and peace shall be with you;
Cross Reference Matthew 1:23 in Marathi 23 “पाहा कुमारी गर्भवती होईल अाणि पुत्राला जन्म देईल, आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, आम्हाबरोबर देव.
Matthew 5:48 in Marathi 48 ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा’.
Mark 9:50 in Marathi 50 “मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा.
Mark 10:49 in Marathi 49 मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलावून म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलवत आहे.”
Luke 9:61 in Marathi 61 तेव्हा आणखी एक जण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे.
John 17:23 in Marathi 23 म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरहि प्रीती केली.
Acts 15:29 in Marathi 29 त्या म्हणजे मुर्तीला अर्पीलेले पदार्थ, रक्त, गळा दाबुन मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी ; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेंमकुशल असो.
Acts 18:21 in Marathi 21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन.” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
Acts 23:30 in Marathi 30 ह्या माणसा विरुध्द कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. सुखरूप असावे
Romans 12:16 in Marathi 16 एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
Romans 12:18 in Marathi 18 शक्य असल्यास, सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
Romans 14:19 in Marathi 19 तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्या मागे लागू या.
Romans 15:5 in Marathi 5 आता, जो धीर व उत्तेजन देतो, तो देव तुम्हाला असे देवो की, तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
Romans 15:33 in Marathi 33 आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Romans 16:20 in Marathi 20 आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
1 Corinthians 1:10 in Marathi 10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे.
2 Corinthians 1:4 in Marathi 4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की,ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात अाहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
2 Corinthians 13:9 in Marathi 9 जेव्हा आम्ही दुर्बळ आहो व तुम्ही बलवान आहा तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
2 Corinthians 13:14 in Marathi 14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Ephesians 4:3 in Marathi 3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. “
Ephesians 6:23 in Marathi 23 देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 2:1 in Marathi 1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता,काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
Philippians 3:16 in Marathi 16 तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.
Philippians 4:2 in Marathi 2 मी युवदियेला विनंती करतो, आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायीं एकमनाचे व्हा.
Philippians 4:4 in Marathi 4 प्रभूमध्ये सर्वदाआनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
Philippians 4:9 in Marathi 9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा, आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
1 Thessalonians 4:1 in Marathi 1 बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून एेकून घेतले व त्याप्रमाणे वागत आहा, त्यांत तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
1 Thessalonians 4:18 in Marathi 18 म्हणून तुम्ही ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.
1 Thessalonians 5:13 in Marathi 13 आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना, आणि एकमेकांशी शांतीने रहा.
1 Thessalonians 5:16 in Marathi 16 सदोदित आनंद करा.
1 Thessalonians 5:23 in Marathi 23 आणि स्वतः शांतीचा देव तुम्हाला पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
2 Thessalonians 3:16 in Marathi 16 शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
2 Timothy 2:22 in Marathi 22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुध्द अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग.
Hebrews 12:14 in Marathi 14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
James 1:4 in Marathi 4 आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे.
James 3:17 in Marathi 17 पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुध्द, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
1 Peter 3:8 in Marathi 8 शेवटी सर्व जण एकमनाचे व्हा; आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
1 Peter 3:11 in Marathi 11 त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
1 John 4:8 in Marathi 8 जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे.
Revelation 22:21 in Marathi 21 प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.