2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
Other Translations King James Version (KJV) But I fear, lest by any means, as the serpent beguiled Eve through his subtilty, so your minds should be corrupted from the simplicity that is in Christ.
American Standard Version (ASV) But I fear, lest by any means, as the serpent beguiled Eve in his craftiness, your minds should be corrupted from the simplicity and the purity that is toward Christ.
Bible in Basic English (BBE) But I have a fear, that in some way, as Eve was tricked by the deceit of the snake, your minds may be turned away from their simple and holy love for Christ.
Darby English Bible (DBY) But I fear lest by any means, as the serpent deceived Eve by his craft, [so] your thoughts should be corrupted from simplicity as to the Christ.
World English Bible (WEB) But I am afraid that somehow, as the serpent deceived Eve in his craftiness, so your minds might be corrupted from the simplicity that is in Christ.
Young's Literal Translation (YLT) and I fear, lest, as the serpent did beguile Eve in his subtilty, so your minds may be corrupted from the simplicity that `is' in the Christ;
Cross Reference Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
John 8:44 in Marathi 44 तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणं करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
Acts 20:30 in Marathi 30 तुमच्यामधूनसुध्दा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील.
Romans 12:8 in Marathi 8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
2 Corinthians 1:12 in Marathi 12 आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण,म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुध्दीची साक्ष होय.आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
2 Corinthians 2:17 in Marathi 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
2 Corinthians 11:13 in Marathi 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत
2 Corinthians 11:29 in Marathi 29 कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो, आणि मला संताप होत नाही?
2 Corinthians 12:20 in Marathi 20 कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हाला आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध,स्वार्थी महत्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील.
Galatians 1:6 in Marathi 6 मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या सुवार्तेकडे वळला आहा.
Galatians 2:4 in Marathi 4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
Galatians 3:1 in Marathi 1 अहो बुध्दीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे?
Galatians 4:11 in Marathi 11 तुमच्यासाठी की, मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Ephesians 6:24 in Marathi 24 जे सर्व जण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
Philippians 3:18 in Marathi 18 कारण मी तुम्हाला, पुष्कळ वेळा, सांगितले आलो,आणि आता रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
Colossians 2:4 in Marathi 4 कोणी तुम्हाला लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
Colossians 2:8 in Marathi 8 तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हाला ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
Colossians 2:18 in Marathi 18 लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्व:ताला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
1 Thessalonians 3:5 in Marathi 5 ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित सैतानाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
2 Thessalonians 2:3 in Marathi 3 कोणत्याहि प्रकारे कोणाकडून फसू नका;कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष,नाशाचा पुत्र प्रकट होईल;
1 Timothy 1:3 in Marathi 3 मी मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंति केली होती तशी आतांही करतो की तू इफिसात राहावे, यासाठी की, तू कित्येकास निक्षून सांगावे की ,की त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.
1 Timothy 2:14 in Marathi 14 आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
1 Timothy 4:1 in Marathi 1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
2 Timothy 3:1 in Marathi 1 परंतु शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचा समय आपल्यावर येईल हे समजून घे.
2 Timothy 3:13 in Marathi 13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
2 Timothy 4:3 in Marathi 3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, .
Titus 1:10 in Marathi 10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. ,
Hebrews 13:9 in Marathi 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरणे बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
2 Peter 3:3 in Marathi 3 प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील,
2 Peter 3:17 in Marathi 17 तर प्रियजनहो, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सांपडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये हयासाठी जपून राहा.
1 John 2:18 in Marathi 18 माझ्या लहान मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत;ह्यावरून आपल्याला दिसून येते की,ही शेवटली घटका आहे.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
Jude 1:4 in Marathi 4 कारण, जे ह्या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येक जण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत,त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटुन तिला कामातुर पणाचे स्वरुप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Revelation 20:2 in Marathi 2 आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले,