2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
Other Translations King James Version (KJV) Are they ministers of Christ? (I speak as a fool) I am more; in labours more abundant, in stripes above measure, in prisons more frequent, in deaths oft.
American Standard Version (ASV) Are they ministers of Christ? (I speak as one beside himself) I more; in labors more abundantly, in prisons more abundantly, in stripes above measure, in deaths oft.
Bible in Basic English (BBE) Are they servants of Christ? (I am talking foolishly) I am more so; I have had more experience of hard work, of prisons, of blows more than measure, of death.
Darby English Bible (DBY) Are they ministers of Christ? (I speak as being beside myself) *I* above measure [so]; in labours exceedingly abundant, in stripes to excess, in prisons exceedingly abundant, in deaths oft.
World English Bible (WEB) Are they servants of Christ? (I speak as one beside himself) I am more so; in labors more abundantly, in prisons more abundantly, in stripes above measure, in deaths often.
Young's Literal Translation (YLT) ministrants of Christ are they? -- as beside myself I speak -- I more; in labours more abundantly, in stripes above measure, in prisons more frequently, in deaths many times;
Cross Reference Acts 9:16 in Marathi 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
Acts 14:19 in Marathi 19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
Acts 16:23 in Marathi 23 मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला;
Acts 20:23 in Marathi 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो
Acts 21:11 in Marathi 11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरूशलेम येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”
Acts 24:26 in Marathi 26 आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे .
Acts 25:14 in Marathi 14 तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, '' फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे.
Acts 27:1 in Marathi 1 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता.
Acts 28:16 in Marathi 16 आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली. परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.
Acts 28:30 in Marathi 30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.
Romans 8:36 in Marathi 36 कारण असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’
1 Corinthians 3:5 in Marathi 5 तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. जसे प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.
1 Corinthians 4:1 in Marathi 1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
1 Corinthians 15:10 in Marathi 10 पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
1 Corinthians 15:30 in Marathi 30 आणि आम्हीसुध्दा प्रत्येक वेळी संकटात का पडतो?
2 Corinthians 1:9 in Marathi 9 खरोखर आम्हाला वाटत होते की,आम्ही मरणारच ,पण आम्ही स्वतःवर भरवसा ठेवू नये, तर जो देव मेलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा,म्हणून हे घडले.
2 Corinthians 3:6 in Marathi 6 त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण आत्म्याद्वारे केलेला आहे; कारण लेख मारून टाकतो, पण आत्मा जीवंत करतो.
2 Corinthians 4:11 in Marathi 11 कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मर्त्य देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
2 Corinthians 6:4 in Marathi 4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटांत, आपत्तीत व दुःखांत;
2 Corinthians 6:9 in Marathi 9 अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो, आणि तरी मेलो नाही.
2 Corinthians 10:7 in Marathi 7 डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.
2 Corinthians 11:5 in Marathi 5 पण मला वाटते मी अति श्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही.
2 Corinthians 11:24 in Marathi 24 पाच वेळेला यहूद्यांकडून मला (“चाळीस चाबकाचे फटके वजा एक”.) एकोणचाळीस फटके बसले.
2 Corinthians 12:11 in Marathi 11 मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही.
Ephesians 3:1 in Marathi 1 या कारणासाठी मी, पौल तुम्हा परराष्ट्रीयासाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे. “
Ephesians 4:1 in Marathi 1 “म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा. “
Ephesians 6:20 in Marathi 20 मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
Philippians 1:13 in Marathi 13 म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिध्द झाले;
Philippians 2:17 in Marathi 17 तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
Colossians 1:29 in Marathi 29 ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्यानें त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.
1 Thessalonians 3:2 in Marathi 2 आणि आम्ही आपला बंधु तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हाला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;
1 Timothy 4:6 in Marathi 6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
2 Timothy 1:8 in Marathi 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्या प्रमाणे तू माझ्या बरोबर दुःखाचा वाटा घे.
2 Timothy 1:16 in Marathi 16 अनेसिफराच्या घरावर प्रभू दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.
2 Timothy 2:9 in Marathi 9 कारण सुवार्तेमुळे मी दुःख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे वचन बांधले गेले नाही.
Philemon 1:9 in Marathi 9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृध्द झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
Hebrews 10:34 in Marathi 34 जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला. आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.