2 Corinthians 1:20 in Marathi 20 कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
Other Translations King James Version (KJV) For all the promises of God in him are yea, and in him Amen, unto the glory of God by us.
American Standard Version (ASV) For how many soever be the promises of God, in him is the yea: wherefore also through him is the Amen, unto the glory of God through us.
Bible in Basic English (BBE) For he is the Yes to all the undertakings of God: and by him all the words of God are made certain and put into effect, to the glory of God through us.
Darby English Bible (DBY) For whatever promises of God [there are], in him is the yea, and in him the amen, for glory to God by us.
World English Bible (WEB) For however many are the promises of God, in him is the "Yes." Therefore also through him is the "Amen," to the glory of God through us.
Young's Literal Translation (YLT) for as many as `are' promises of God, in him `are' the Yes, and in him the Amen, for glory to God through us;
Cross Reference Matthew 6:13 in Marathi 13 आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला त्या दुष्टापासून सोडव.’ कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहेत.
Luke 1:68 in Marathi 68 'इस्राएलाचा देव प्रभू', हयाची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांना सोडविण्यासाठी मार्ग तयार केला.
Luke 2:14 in Marathi 14 परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या माणसांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.
John 1:17 in Marathi 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
Acts 3:25 in Marathi 25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीव्दारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.
Acts 13:32 in Marathi 32 आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
Romans 6:23 in Marathi 23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. *
Romans 11:36 in Marathi 36 कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
Romans 15:7 in Marathi 7 म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.
1 Corinthians 14:16 in Marathi 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
2 Corinthians 4:15 in Marathi 15 सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.
Galatians 3:16 in Marathi 16 आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
Galatians 3:22 in Marathi 22 तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यांत उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यांत यावे.
Ephesians 1:6 in Marathi 6 “त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले . ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हाला फुकट दिली. “
Ephesians 1:12 in Marathi 12 ज्या आम्ही ख्रिस्तावर आधीच आशा ठेवली त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.
Ephesians 2:7 in Marathi 7 “देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या महान कृपेची अपार समृध्दी दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाविषयीची ममता व्यक्त करावी.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Hebrews 6:12 in Marathi 12 आम्हाला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
Hebrews 7:6 in Marathi 6 मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्याला (अब्राहामाला) त्याने आशीर्वाद दिला.
Hebrews 9:10 in Marathi 10 हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
Hebrews 11:13 in Marathi 13 हे सगळे विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण 'पृथ्वीवर परके आणि प्रवासी' आहोत.
Hebrews 11:39 in Marathi 39 ह्या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही.
Hebrews 13:8 in Marathi 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
1 Peter 1:12 in Marathi 12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
1 John 2:24 in Marathi 24 तुमच्या विषयी जे म्हणावयाचे तर,जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून एेकले ते जर तुम्हामध्ये राहिले,तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
1 John 5:11 in Marathi 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Revelation 7:12 in Marathi 12 म्हणाले, “आमेन!धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत! आमेन!”.