2 Corinthians 1:19 in Marathi 19 कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ‘होय किंवा नाही’ असा नव्हता तर त्याच्यात ‘होय'अशीच होती.
Other Translations King James Version (KJV) For the Son of God, Jesus Christ, who was preached among you by us, even by me and Silvanus and Timotheus, was not yea and nay, but in him was yea.
American Standard Version (ASV) For the Son of God, Jesus Christ, who was preached among you by us, `even' by me and Silvanus and Timothy, was not yea and nay, but in him is yea.
Bible in Basic English (BBE) For the Son of God, Jesus Christ, whom we were preaching among you, even I and Silvanus and Timothy, was not Yes and No, but in him is Yes.
Darby English Bible (DBY) For the Son of God, Jesus Christ, he who has been preached by us among you (by me and Silvanus and Timotheus), did not become yea and nay, but yea *is* in him.
World English Bible (WEB) For the Son of God, Jesus Christ, who was preached among you by us, by me, Silvanus, and Timothy, was not "Yes and no," but in him is "Yes."
Young's Literal Translation (YLT) for the Son of God, Jesus Christ, among you through us having been preached -- through me and Silvanus and Timotheus -- did not become Yes and No, but in him it hath become Yes;
Cross Reference Matthew 3:17 in Marathi 17 आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.
Matthew 16:16 in Marathi 16 शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
Matthew 17:5 in Marathi 5 तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
Matthew 24:35 in Marathi 35 आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
Matthew 26:63 in Marathi 63 पण येशूने काहीच उत्तर दिले नाही.परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
Matthew 27:40 in Marathi 40 म्हणू लागले, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या,’ स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.
Matthew 27:54 in Marathi 54 आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.
Mark 1:1 in Marathi 1 देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
Luke 1:35 in Marathi 35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
John 1:34 in Marathi 34 मी स्वतः पाहिले आहे, आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
John 1:49 in Marathi 49 नथनेलाने उत्तर दिले, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.”
John 3:16 in Marathi 16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.
John 3:35 in Marathi 35 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे.
John 6:69 in Marathi 69 आणि आम्ही विश्वास ठेवला आहे, आणि जाणतो की, तू देवाचा पवित्र पुरूष आपण आहा.”
John 8:58 in Marathi 58 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”
John 19:7 in Marathi 7 यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, “ आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे; कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले.”
John 20:28 in Marathi 28 आणि थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”
John 20:31 in Marathi 31 पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.
Acts 8:36 in Marathi 36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ)आले. अधिकारी म्हणाला, “पाहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.त्याने उत्तर दिले,येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
Acts 9:20 in Marathi 20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला. की, येशू हा देवाचा पुत्र आहे.
Acts 15:22 in Marathi 22 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजणातील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.
Acts 18:5 in Marathi 5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला.
Romans 1:3 in Marathi 3 ती त्याचा पुत्र येशू आपला प्रभू हयाच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्माला आला.
Hebrews 1:11 in Marathi 11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
Hebrews 13:8 in Marathi 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
2 Peter 1:17 in Marathi 17 कारण त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा एेश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा प्रिय पुत्र,मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे’.
1 John 1:3 in Marathi 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
1 John 5:9 in Marathi 9 जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
2 John 1:9 in Marathi 9 ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहतां जो पुढेंपुढेंच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ति झाली आहे.
Revelation 1:8 in Marathi 8 प्रभू देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे. ”
Revelation 1:11 in Marathi 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही, आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया ह्या सात मंडळ्यांना पाठव. ”
Revelation 1:17 in Marathi 17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या सारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला,
Revelation 2:18 in Marathi 18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत.