1 Timothy 6:4 in Marathi 4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.
Other Translations King James Version (KJV) He is proud, knowing nothing, but doting about questions and strifes of words, whereof cometh envy, strife, railings, evil surmisings,
American Standard Version (ASV) he is puffed up, knowing nothing, but doting about questionings and disputes of words, whereof cometh envy, strife, railings, evil surmisings,
Bible in Basic English (BBE) He has an over-high opinion of himself; being without knowledge, having only an unhealthy love of questionings and wars of words, from which come envy, fighting, cruel words, evil thoughts,
Darby English Bible (DBY) he is puffed up, knowing nothing, but sick about questions and disputes of words, out of which arise envy, strife, injurious words, evil suspicions,
World English Bible (WEB) he is conceited, knowing nothing, but obsessed with arguments, disputes, and word battles, from which come envy, strife, reviling, evil suspicions,
Young's Literal Translation (YLT) he is proud, knowing nothing, but doting about questions and word-striving, out of which doth come envy, strife, evil-speakings, evil-surmisings,
Cross Reference Acts 8:9 in Marathi 9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे शोमरोनी लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे
Acts 8:21 in Marathi 21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.
Acts 15:2 in Marathi 2 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबधाने यरूशलेमेतले प्रेषीत व वडीलवर्ग हयांच्याकडे जावे.
Acts 18:15 in Marathi 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!”
Romans 2:8 in Marathi 8 परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना क्रोध व कोप,
Romans 12:16 in Marathi 16 एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
Romans 13:13 in Marathi 13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.
Romans 14:1 in Marathi 1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
1 Corinthians 3:3 in Marathi 3 तुम्ही अजूनसुध्दा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय, व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?
1 Corinthians 3:18 in Marathi 18 कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
1 Corinthians 8:1 in Marathi 1 आता, मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.
1 Corinthians 11:16 in Marathi 16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
1 Corinthians 11:18 in Marathi 18 प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात, आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो.
2 Corinthians 11:20 in Marathi 20 वस्तुतः जे कोणी तुम्हाला दास करते, किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.
Galatians 5:15 in Marathi 15 पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकिता, तर तुम्ही एकमेकांचा संहार करू नये म्हणून जपा.
Galatians 5:20 in Marathi 20 मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट,
Galatians 5:26 in Marathi 26 आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चिरडीस आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये.
Galatians 6:3 in Marathi 3 कारण आपण कोणी नसता कोणी तरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.
Philippians 1:15 in Marathi 15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही सदिच्छेने करीत आहेत.
Philippians 2:3 in Marathi 3 आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.
Philippians 2:14 in Marathi 14 जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करितां करा;
Colossians 2:18 in Marathi 18 लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्व:ताला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
2 Thessalonians 2:4 in Marathi 4 तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरांत बसणारा असा आहे.
1 Timothy 1:4 in Marathi 4 आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या , पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका . तेच मी आतांही सांगतो .
1 Timothy 1:7 in Marathi 7 त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
1 Timothy 3:6 in Marathi 6 तो ह्या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.
2 Timothy 2:14 in Marathi 14 लोकांना या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुध्द करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.
2 Timothy 2:23 in Marathi 23 परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात.
2 Timothy 3:4 in Marathi 4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली , देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील;
Titus 3:9 in Marathi 9 पण मूर्खपणाचे वाद, वंशावळी, कलह, आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा; कारण ह्या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.
James 1:19 in Marathi 19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा.
James 2:14 in Marathi 14 माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की, ‘माझ्याजवळ विश्वास आहे’; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्याला काय लाभ? विश्वास त्याला तारू शकेल काय?
James 4:1 in Marathi 1 तुमच्यात लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
James 4:5 in Marathi 5 किंवा ‘आपल्यात राहणारा आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हाला वाटते काय?
1 Peter 2:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,
2 Peter 2:12 in Marathi 12 पण जे निर्बुध्द प्राणी, नैसर्गिकरीत्या, धरले जाण्यास व मारले जाण्यास जन्मास येतात त्याच्याप्रमाणे हे स्वतःला न समजणार्या गोष्टींविषयी वाईट बोलतात; आणि स्वतःच्या भ्रष्टतेत नाश पावतील.
2 Peter 2:18 in Marathi 18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.
Jude 1:10 in Marathi 10 परंतु हे लोक ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टींविषयी वाईट बोलतात. पण त्यांना निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे, नैसर्गिक रीत्या ज्या गोष्टी समजतात त्याद्वारे ते स्वतःचाच नाश करतात.
Jude 1:16 in Marathi 16 ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट आपल्या वाट्याला दोष लावणारे व आपल्या वासनांप्रमाणे चालतात. ते तोंडाने ते फुशारकी करतात व आपल्या लाभासाठी ते मनुष्यांची वाहवा करतात.
Revelation 3:17 in Marathi 17 तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कशाची गरज नाही. पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.