1 Timothy 6:20 in Marathi 20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.
Other Translations King James Version (KJV) O Timothy, keep that which is committed to thy trust, avoiding profane and vain babblings, and oppositions of science falsely so called:
American Standard Version (ASV) O Timothy, guard that which is committed unto `thee', turning away from the profane babblings and oppositions of the knowledge which is falsely so called;
Bible in Basic English (BBE) O Timothy, take good care of that which is given to you, turning away from the wrong and foolish talk and arguments of that knowledge which is falsely so named;
Darby English Bible (DBY) O Timotheus, keep the entrusted deposit, avoiding profane, vain babblings, and oppositions of false-named knowledge,
World English Bible (WEB) Timothy, guard that which is committed to you, turning away from the empty chatter and oppositions of the knowledge which is falsely so called;
Young's Literal Translation (YLT) O Timotheus, the thing entrusted guard thou, avoiding the profane vain-words and opposition of the falsely-named knowledge,
Cross Reference Acts 17:18 in Marathi 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो ? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो; कारण येशू व पुनरुत्थान हयाविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.
Acts 17:21 in Marathi 21 काहीतरी नवलविशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथैनेकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.
Romans 1:22 in Marathi 22 स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.
Romans 3:2 in Marathi 2 सर्व बाबतीत पुष्कळच; आहे.प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.
1 Corinthians 1:19 in Marathi 19 कारण असे लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुध्दिवंतांची बुध्दि मी व्यर्थ करीन.”
1 Corinthians 2:6 in Marathi 6 जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, परंतु ते ज्ञान ह्या जगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
1 Corinthians 3:19 in Marathi 19 कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. कारण असे लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”
Colossians 2:8 in Marathi 8 तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हाला ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
Colossians 2:18 in Marathi 18 लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्व:ताला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
2 Thessalonians 1:4 in Marathi 4 ह्या वरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमची प्रशंसा करतो.
2 Thessalonians 2:15 in Marathi 15 तर मग बंधूनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.
1 Timothy 1:4 in Marathi 4 आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या , पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका . तेच मी आतांही सांगतो .
1 Timothy 1:6 in Marathi 6 या गोष्टी सोडून कित्येक जण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.
1 Timothy 1:11 in Marathi 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
1 Timothy 4:7 in Marathi 7 परंतु अमंगळपणाच्या आणि म्हाताऱ्या बायकांच्या व्यर्थ कहाण्या टाकून दे आणि तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
1 Timothy 6:4 in Marathi 4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.
1 Timothy 6:11 in Marathi 11 हे देवाच्या माणसा , तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता, आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
1 Timothy 6:14 in Marathi 14 आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यत निष्कलंक आणि निर्दोष राहावे म्हणून ही आज्ञा पाळ.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 2:1 in Marathi 1 माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.
2 Timothy 2:16 in Marathi 16 पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
2 Timothy 3:14 in Marathi 14 पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा.
Titus 1:4 in Marathi 4 देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा ज्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो ह्याच्यापासून कृपा,दया व शांती असो.
Titus 1:9 in Marathi 9 आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासहि शक्तिमान् व्हावे.
Titus 1:14 in Marathi 14 यासाठी की,त्यांनी यहूदी कहाण्यांकडे, आणि सत्याकडून वळविणार्या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.विश्वासात खंबीर व्हावे.
Titus 3:9 in Marathi 9 पण मूर्खपणाचे वाद, वंशावळी, कलह, आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा; कारण ह्या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.
Revelation 3:3 in Marathi 3 म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले ह्याची आठवण कर , त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हाला कळणार नाही.