1 Timothy 6:12 in Marathi 12 विश्वासा संबंधी चांगले युध्द कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,
Other Translations King James Version (KJV) Fight the good fight of faith, lay hold on eternal life, whereunto thou art also called, and hast professed a good profession before many witnesses.
American Standard Version (ASV) Fight the good fight of the faith, lay hold on the life eternal, whereunto thou wast called, and didst confess the good confession in the sight of many witnesses.
Bible in Basic English (BBE) Be fighting the good fight of the faith; take for yourself the life eternal, for which you were marked out, and of which you gave witness in the eyes of all.
Darby English Bible (DBY) Strive earnestly [in] the good conflict of faith. Lay hold of eternal life, to which thou hast been called, and hast confessed the good confession before many witnesses.
World English Bible (WEB) Fight the good fight of faith. Lay hold of the eternal life to which you were called, and you confessed the good confession in the sight of many witnesses.
Young's Literal Translation (YLT) be striving the good strife of the faith, be laying hold on the life age-during, to which also thou wast called, and didst profess the right profession before many witnesses.
Cross Reference Luke 12:8 in Marathi 8 “ जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.
Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 10:9 in Marathi 9 कारण, येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
1 Corinthians 9:25 in Marathi 25 स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
2 Corinthians 6:7 in Marathi 7 सत्याच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे बाळगून,
2 Corinthians 9:13 in Marathi 13 ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
2 Corinthians 10:3 in Marathi 3 कारण, आम्ही देहात चालणारे असूनही अाम्ही देहस्वभावाप्रमाणे युध्द करत नसतो.
Ephesians 6:10 in Marathi 10 शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
Philippians 3:12 in Marathi 12 मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यांत घेतले ते मी आपल्या ताब्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे.
Colossians 3:15 in Marathi 15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
1 Thessalonians 5:8 in Marathi 8 परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे;विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
2 Thessalonians 2:14 in Marathi 14 त्यांत त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
1 Timothy 1:18 in Marathi 18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.
1 Timothy 6:13 in Marathi 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.
1 Timothy 6:19 in Marathi 19 जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतः साठी करावा.
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 4:7 in Marathi 7 मी सुयुध्द केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
Hebrews 3:14 in Marathi 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
Hebrews 13:23 in Marathi 23 आपला बंधू तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
1 John 2:25 in Marathi 25 आणि देवाने आम्हाला जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.
Revelation 3:3 in Marathi 3 म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले ह्याची आठवण कर , त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हाला कळणार नाही.