1 Timothy 4 in Marathi

1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

2 ज्या माणसांची सदसदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्या कडे लक्ष देेतील.

3 ते लोकांना लग्न करण्यास मना करतील व जी अन्ने विश्वासणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.

4 तर देवाने अस्तित्वांत आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे , आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीहि वर्ज्य नाही.

5 कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.

6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

7 परंतु अमंगळपणाच्या आणि म्हाताऱ्या बायकांच्या व्यर्थ कहाण्या टाकून दे आणि तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.

8 कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

9 हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे.

10 याकरता आम्ही श्रम व खटपट करतो, कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा , त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे .

11 ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव.

12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .

13 मी येई पर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, ह्याकडे लक्ष्य लाव .

14 तुझ्या वर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशांच्या द्वारे देण्यांत आलेले असे जे कृपादान तुझ्या मध्ये आहे , त्याकडे दुर्लक्ष करू नको जे.

15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी.

16 आपणाकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.