Cross Reference Matthew 1:23 in Marathi 23 “पाहा कुमारी गर्भवती होईल अाणि पुत्राला जन्म देईल, आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, आम्हाबरोबर देव.
Matthew 3:16 in Marathi 16 मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबूतरासारखा उतरताना व आपणावर येतांना पाहीला ,
Matthew 4:11 in Marathi 11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले
Matthew 13:11 in Marathi 11 त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
Matthew 28:2 in Marathi 2 त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
Mark 1:13 in Marathi 13 सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
Mark 16:5 in Marathi 5 त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
Mark 16:19 in Marathi 19 मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
Luke 2:10 in Marathi 10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याचे शुभवर्तमान मी तुम्हास सांगतो.
Luke 2:32 in Marathi 32 ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या 'इस्राएल' लोकांचें वैभव असे आहे.
Luke 22:43 in Marathi 43 स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला
Luke 24:4 in Marathi 4 यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
Luke 24:51 in Marathi 51 तो आशीर्वाद देत असतानाच तो वर आकाशात घेतला गेला.
John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
John 1:32 in Marathi 32 आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
John 6:62 in Marathi 62 मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर?
John 13:3 in Marathi 3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:8 in Marathi 8 आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खातरी करील.
John 16:28 in Marathi 28 मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
John 17:5 in Marathi 5 तर आता, हे माझ्या बापा, हे जग होण्याआधी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.
John 20:12 in Marathi 12 आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले.
Acts 1:1 in Marathi 1 हे थियफिल महाराज, येशूचे जे प्रेषित होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला,
Acts 1:19 in Marathi 19 हे यरूशलेमेत राहणाऱ्या सर्वाना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे).
Acts 2:32 in Marathi 32 त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो.
Acts 10:34 in Marathi 34 पेत्राने बोलायला सुरुवात केली “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
Acts 14:27 in Marathi 27 ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने विश्वासाचे दार कसे उघडले ते सांगितले,
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Romans 1:3 in Marathi 3 ती त्याचा पुत्र येशू आपला प्रभू हयाच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्माला आला.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 9:5 in Marathi 5 पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन.
Romans 10:12 in Marathi 12 यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे.
Romans 10:18 in Marathi 18 पण मी म्हणतो की, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, निःसंशय, ‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’
1 Corinthians 2:7 in Marathi 7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
1 Corinthians 15:47 in Marathi 47 पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.
Galatians 2:8 in Marathi 8 कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाहि परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
Galatians 4:4 in Marathi 4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 3:3 in Marathi 3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे मला सत्याचे रहस्य कळवले गेले मी ते यापुर्वी थोडक्यात लिहिले होते.
Ephesians 4:8 in Marathi 8 “ वचन असे म्हणते. “जेव्हा तो उच्चस्थानी चढला, तेव्हा त्याने युध्दकैदयास कैद करून नेले, आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.,
Ephesians 6:19 in Marathi 19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करा,जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
Philippians 2:6 in Marathi 6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
Colossians 1:6 in Marathi 6 ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत, आणि तुम्हाला सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
Colossians 1:16 in Marathi 16 कारण, स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Colossians 2:2 in Marathi 2 ते परिश्रम ह्यांसाठी की,त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुध्दीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी;व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
2 Thessalonians 2:7 in Marathi 7 कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यत अडथळा करीत राहील;
1 Timothy 3:9 in Marathi 9 देवाने जे आम्हाला प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी शुध्द विवेकाने धरून ठेवावे.
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 2:9 in Marathi 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
Hebrews 7:7 in Marathi 7 यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.
Hebrews 8:1 in Marathi 1 आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे कीः असा मुख्य याजक आम्हाला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो,
Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
1 Peter 1:12 in Marathi 12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 Peter 3:22 in Marathi 22 तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे; आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
1 John 1:2 in Marathi 2 ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हाला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हाला प्रकट केले गेले.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
1 John 5:6 in Marathi 6 जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.
Revelation 1:17 in Marathi 17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या सारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला,
Revelation 7:9 in Marathi 9 या गोष्टीनंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. पांढरे झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या हाेत्या.
Revelation 17:5 in Marathi 5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, ‘महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. ’
Revelation 17:7 in Marathi 7 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला ह्या स्त्रीचं, आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, (ज्याला सात डोकी आणि दहा शिगे आहेत) त्या पशूचे रहस्य सांगतो.