1 Thessalonians 5:14 in Marathi 14 आता बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
Other Translations King James Version (KJV) Now we exhort you, brethren, warn them that are unruly, comfort the feebleminded, support the weak, be patient toward all men.
American Standard Version (ASV) And we exhort you, brethren, admonish the disorderly, encourage the fainthearted, support the weak, be longsuffering toward all.
Bible in Basic English (BBE) And our desire is that you will keep control over those whose lives are not well ordered, giving comfort to the feeble-hearted, supporting those with little strength, and putting up with much from all.
Darby English Bible (DBY) But we exhort you, brethren, admonish the disorderly, comfort the faint-hearted, sustain the weak, be patient towards all.
World English Bible (WEB) We exhort you, brothers, admonish the disorderly, encourage the fainthearted, support the weak, be patient toward all.
Young's Literal Translation (YLT) and we exhort you, brethren, admonish the disorderly, comfort the feeble-minded, support the infirm, be patient unto all;
Cross Reference Matthew 12:20 in Marathi 20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.
Luke 22:32 in Marathi 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Acts 20:31 in Marathi 31 यासाठी सावध राहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
Acts 20:35 in Marathi 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे, व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.”‘
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 14:1 in Marathi 1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
Romans 15:1 in Marathi 1 म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
1 Corinthians 4:14 in Marathi 14 मी तुम्हाला हे लाजविण्यासाठी लिहित नाहीः तर उलट मी तुम्हाला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतो,
1 Corinthians 13:4 in Marathi 4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Galatians 6:1 in Marathi 1 बंधूंनो, कोणी माणूस अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्याला सौम्यतेच्या आत्म्याने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
Ephesians 4:2 in Marathi 2 सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि सहनशीलतेने एकमेकांना प्रीतीने स्वीकारा.”
Ephesians 4:32 in Marathi 32 एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
Colossians 1:28 in Marathi 28 आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्याला बोध करतो, आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्याला आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्याला ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे.
Colossians 3:12 in Marathi 12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून, करूणायुक्त हृदय,दया व सौम्यता, लीनता, व सहनशीलता धारण करा.
1 Thessalonians 2:7 in Marathi 7 तर आपल्या मुलांबाळाचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये साैम्य वृत्तीचे होतो.
2 Thessalonians 3:6 in Marathi 6 बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या सप्रंदाया प्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
2 Thessalonians 3:11 in Marathi 11 तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात,असे आम्ही एेकतो.
1 Timothy 3:3 in Marathi 3 तो मद्य पिणारा किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा तर तो सौम्य, न भांडणारा,पैशाचा लोभ न धरणारा.
1 Timothy 6:11 in Marathi 11 हे देवाच्या माणसा , तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता, आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
2 Timothy 2:24 in Marathi 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
2 Timothy 4:2 in Marathi 2 वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
Titus 1:6 in Marathi 6 ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पति असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
Titus 1:10 in Marathi 10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. ,
Hebrews 5:2 in Marathi 2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो.
Hebrews 12:12 in Marathi 12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!
Hebrews 13:3 in Marathi 3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.