1 Thessalonians 5:12 in Marathi 12 आणि बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
Other Translations King James Version (KJV) And we beseech you, brethren, to know them which labour among you, and are over you in the Lord, and admonish you;
American Standard Version (ASV) But we beseech you, brethren, to know them that labor among you, and are over you in the Lord, and admonish you;
Bible in Basic English (BBE) But we make this request to you, my brothers: give attention to those who are working among you, who are over you in the Lord to keep order among you;
Darby English Bible (DBY) But we beg you, brethren, to know those who labour among you, and take the lead among you in [the] Lord, and admonish you,
World English Bible (WEB) But we beg you, brothers, to know those who labor among you, and are over you in the Lord, and admonish you,
Young's Literal Translation (YLT) And we ask you, brethren, to know those labouring among you, and leading you in the Lord, and admonishing you,
Cross Reference Matthew 9:37 in Marathi 37 तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत.
Luke 10:1 in Marathi 1 ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः: जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपल्या पुढे पाठवले.
Luke 10:7 in Marathi 7 तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा; कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे; घरोघरी फिरूं नका.
John 4:38 in Marathi 38 ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हाला पाठवले. दुसर्यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्यांच्या कष्टात वाटेकरी झाला आहात.”
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Acts 20:35 in Marathi 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे, व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.”‘
1 Corinthians 3:9 in Marathi 9 कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात, व देवाची इमारत आहा.
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
1 Corinthians 15:10 in Marathi 10 पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
1 Corinthians 16:16 in Marathi 16 प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुध्दा अधीन व्हा.
1 Corinthians 16:18 in Marathi 18 कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांना मान्यता द्या.
2 Corinthians 5:9 in Marathi 9 म्हणून आम्ही झटत आहो, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
Galatians 4:11 in Marathi 11 तुमच्यासाठी की, मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.
Philippians 2:16 in Marathi 16 त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमहि व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
Philippians 2:19 in Marathi 19 प्रभू येशूत मी आशा करतो की, लवकरच मी तिमथ्याला तुमच्याकडे पाठवेल म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल.
Colossians 1:29 in Marathi 29 ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्यानें त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.
1 Thessalonians 2:9 in Marathi 9 बंधूनो, आमचे श्रम व कष्ट ह्याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
1 Thessalonians 5:14 in Marathi 14 आता बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
1 Timothy 5:1 in Marathi 1 वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर.
1 Timothy 5:17 in Marathi 17 जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे,
1 Timothy 5:20 in Marathi 20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
2 Timothy 2:6 in Marathi 6 कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
Titus 1:3 in Marathi 3 त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून
Titus 1:5 in Marathi 5 मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.
Titus 2:15 in Marathi 15 तू ह्या गोष्टी समजावून सांग, बोध कर, आणि, सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.
Hebrews 13:7 in Marathi 7 ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा. व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
Hebrews 13:17 in Marathi 17 आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.
1 Peter 5:2 in Marathi 2 तुमच्यामधील, देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने; द्रव्यलोभासाठी नाही, पण उत्सुकतेने; करा
Revelation 1:20 in Marathi 20 जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.
Revelation 2:3 in Marathi 3 मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दु:ख सहन केले आणि तू थकला नाहीस.
Revelation 2:8 in Marathi 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो
Revelation 2:12 in Marathi 12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: “ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी(दुधारी) तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
Revelation 2:18 in Marathi 18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत.
Revelation 3:1 in Marathi 1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही “ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत अाहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मेलेले आहात.
Revelation 3:7 in Marathi 7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत_ ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.