1 Thessalonians 4:1 in Marathi 1 बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून एेकून घेतले व त्याप्रमाणे वागत आहा, त्यांत तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
Other Translations King James Version (KJV) Furthermore then we beseech you, brethren, and exhort you by the Lord Jesus, that as ye have received of us how ye ought to walk and to please God, so ye would abound more and more.
American Standard Version (ASV) Finally then, brethren, we beseech and exhort you in the Lord Jesus, that, as ye received of us how ye ought to walk and to please God, even as ye do walk, --that ye abound more and more.
Bible in Basic English (BBE) And last of all, the prayer which we make to you from our heart and in the name of the Lord Jesus, is this: that as we made clear to you what sort of behaviour is pleasing to God, as in fact you are doing now, so you will go on in these ways, but more and more.
Darby English Bible (DBY) For the rest, then, brethren, we beg you and exhort you in [the] Lord Jesus, even as ye have received from us how ye ought to walk and please God, even as ye also do walk, that ye would abound still more.
World English Bible (WEB) Finally then, brothers, we beg and exhort you in the Lord Jesus, that as you received from us how you ought to walk and to please God, that you abound more and more.
Young's Literal Translation (YLT) As to the rest, then, brethren, we request you, and call upon you in the Lord Jesus, as ye did receive from us how it behoveth you to walk and to please God, that ye may abound the more,
Cross Reference John 15:2 in Marathi 2 माझ्यांतील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला साफसूफ करतो.
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Romans 8:8 in Marathi 8 म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
1 Corinthians 11:23 in Marathi 23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हाला दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,
1 Corinthians 15:1 in Marathi 1 आता बंधूंनो मी तुम्हाला आठवण करून देतो, की जी सुवार्ता मी तुम्हाला गाजवली व जी तुम्ही स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही स्थिरही आहात.
1 Corinthians 15:58 in Marathi 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
2 Corinthians 5:9 in Marathi 9 म्हणून आम्ही झटत आहो, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 Corinthians 10:1 in Marathi 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
2 Corinthians 13:11 in Marathi 11 शेवटी, बंधूंनो आणि बहीणींनो, आनंद करा!तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा; आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
Ephesians 4:1 in Marathi 1 “म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा. “
Ephesians 4:20 in Marathi 20 “परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताबद्दल शिकला नाही.
Ephesians 5:17 in Marathi 17 म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
Philippians 1:9 in Marathi 9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 3:14 in Marathi 14 ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
Colossians 1:10 in Marathi 10 ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्याला शोभेल असे वागावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
Colossians 2:6 in Marathi 6 आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला.
1 Thessalonians 2:11 in Marathi 11 तुम्हास ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,
1 Thessalonians 3:12 in Marathi 12 आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
1 Thessalonians 4:2 in Marathi 2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.
1 Thessalonians 4:10 in Marathi 10 आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहा. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.
2 Thessalonians 1:3 in Marathi 3 बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे,आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
2 Thessalonians 2:1 in Marathi 1 बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की,
2 Thessalonians 3:1 in Marathi 1 बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की,जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगति व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
2 Thessalonians 3:10 in Marathi 10 कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की,कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.
1 Timothy 5:21 in Marathi 21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.
1 Timothy 6:13 in Marathi 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.
2 Timothy 4:1 in Marathi 1 देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
Philemon 1:9 in Marathi 9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृध्द झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
Hebrews 11:6 in Marathi 6 पण विश्वासाशिवाय त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
Hebrews 13:16 in Marathi 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
Hebrews 13:22 in Marathi 22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हाला करतो.
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
1 John 3:22 in Marathi 22 आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे आवडते ते करतो.