1 Thessalonians 2:5 in Marathi 5 कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे; तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलाे नाही. देव साक्षी आहे;
Other Translations King James Version (KJV) For neither at any time used we flattering words, as ye know, nor a cloke of covetousness; God is witness:
American Standard Version (ASV) For neither at any time were we found using words of flattery, as ye know, nor a cloak of covetousness, God is witness;
Bible in Basic English (BBE) For it is common knowledge among you that we never made use of smooth-sounding false words, and God is witness that at no time were we secretly desiring profit for ourselves,
Darby English Bible (DBY) For we have not at any time been [among you] with flattering discourse, even as ye know, nor with a pretext for covetousness, God [is] witness;
World English Bible (WEB) For neither were we at any time found using words of flattery, as you know, nor a cloak of covetousness (God is witness),
Young's Literal Translation (YLT) for at no time did we come with speech of flattery, (as ye have known,) nor in a pretext for covetousness, (God `is' witness!)
Cross Reference Matthew 22:16 in Marathi 16 परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हाला माहीत आहे की आपण खरे आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही.आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही.
Matthew 23:13 in Marathi 13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो,तुम्हाला हाय हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
Acts 20:33 in Marathi 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही.
Romans 1:9 in Marathi 9 मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनांत तुमची आठवण करतो;
Romans 9:1 in Marathi 1 मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही, आणि माझा विवेक, पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
2 Corinthians 2:17 in Marathi 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
2 Corinthians 7:2 in Marathi 2 तुम्ही आमचा अंगिकार करा; आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही.
2 Corinthians 12:17 in Marathi 17 मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय?
Galatians 1:20 in Marathi 20 मी जे तुम्हाला लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही.
1 Thessalonians 2:10 in Marathi 10 तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत आम्ही पवित्रतेने, नीतिने व निर्दोषतेने् कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात, व देवही आहे
1 Timothy 3:3 in Marathi 3 तो मद्य पिणारा किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा तर तो सौम्य, न भांडणारा,पैशाचा लोभ न धरणारा.
1 Timothy 3:8 in Marathi 8 त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी, किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
Titus 1:7 in Marathi 7 अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी,मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;
1 Peter 5:2 in Marathi 2 तुमच्यामधील, देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने; द्रव्यलोभासाठी नाही, पण उत्सुकतेने; करा
2 Peter 2:3 in Marathi 3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
2 Peter 2:18 in Marathi 18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.
Jude 1:11 in Marathi 11 त्यांची केवढी दुर्दशा होणार ! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत, आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.
Revelation 18:12 in Marathi 12 सोन्याचा, रुप्याचा, हिर्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड, आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे, आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे,