1 Thessalonians 2:4 in Marathi 4 तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही माणसांना खूष करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूष होईल तसे बोलतो.
Other Translations King James Version (KJV) But as we were allowed of God to be put in trust with the gospel, even so we speak; not as pleasing men, but God, which trieth our hearts.
American Standard Version (ASV) but even as we have been approved of God to be intrusted with the gospel, so we speak; not as pleasing men, but God who proveth our hearts.
Bible in Basic English (BBE) But even as the good news was given to us by the approval of God, so we give it out; not as pleasing men, but God by whom our hearts are tested.
Darby English Bible (DBY) but even as we have been approved of God to have the glad tidings entrusted to us, so we speak; not as pleasing men, but God, who proves our hearts.
World English Bible (WEB) But even as we have been approved by God to be entrusted with the Gospel, so we speak; not as pleasing men, but God, who tests our hearts.
Young's Literal Translation (YLT) but as we have been approved by God to be entrusted with the good news, so we speak, not as pleasing men, but God, who is proving our hearts,
Cross Reference Luke 12:42 in Marathi 42 तेव्हा प्रभू म्हणाला, प्रभू त्याच्या इतर चाकरांना त्यांचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा शहाणा व विश्वासू कारभारी कोण आहे?
Luke 16:11 in Marathi 11 म्हणून जर तुम्ही जगातील धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील?
John 2:24 in Marathi 24 असे असले तरी येशू त्यांना आेळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता.
John 21:17 in Marathi 17 तो तिसर्यांदा त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, ‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय?’ आणि तो त्याला म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्याला म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
Romans 8:27 in Marathi 27 आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो आत्म्याचे मन जाणतो,कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.
1 Corinthians 2:4 in Marathi 4 माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते.
1 Corinthians 4:1 in Marathi 1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
1 Corinthians 7:25 in Marathi 25 आता कुमारिकांविषयी मला प्रभूकडून काही आज्ञा नाही; पण, विश्वासू राहता येण्यास ज्याच्यावर प्रभूने दया केली आहे असा मी एक असल्यामुळे मी माझे मत देतो.
1 Corinthians 9:17 in Marathi 17 कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुध्द असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
2 Corinthians 5:11 in Marathi 11 म्हणून आम्हाला प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो; पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशीही आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहो.
2 Corinthians 5:16 in Marathi 16 म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.
Galatians 1:10 in Marathi 10 मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय?मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
Galatians 2:7 in Marathi 7 तर उलट सुंता झालेल्यांना सुवार्ता सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्यांत सुवार्ता सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 6:6 in Marathi 6 मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
Colossians 3:22 in Marathi 22 दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. माणसांना खुश करणार्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.
1 Timothy 1:11 in Marathi 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
1 Timothy 6:20 in Marathi 20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.
2 Timothy 1:14 in Marathi 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
2 Timothy 2:2 in Marathi 2 माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांना सोपवून दे.
Titus 1:3 in Marathi 3 त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून
Hebrews 4:13 in Marathi 13 आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हाला सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
Revelation 2:23 in Marathi 23 तर मी तिच्या मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे . मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.