1 Thessalonians 2:16 in Marathi 16 परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो;ते बोलण्याची मनाई करतात; हे ह्यासाठी की,त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत राहावे; त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.
Other Translations King James Version (KJV) Forbidding us to speak to the Gentiles that they might be saved, to fill up their sins alway: for the wrath is come upon them to the uttermost.
American Standard Version (ASV) forbidding us to speak to the Gentiles that they may be saved; to fill up their sins always: but the wrath is come upon them to the uttermost.
Bible in Basic English (BBE) Who, to make the measure of their sins complete, kept us from giving the word of salvation to the Gentiles: but the wrath of God is about to come on them in the fullest degree.
Darby English Bible (DBY) forbidding us to speak to the nations that they may be saved, that they may fill up their sins always: but wrath has come upon them to the uttermost.
World English Bible (WEB) forbidding us to speak to the Gentiles that they may be saved; to fill up their sins always. But wrath has come on them to the uttermost.
Young's Literal Translation (YLT) forbidding us to speak to the nations that they might be saved, to fill up their sins always, but the anger did come upon them -- to the end!
Cross Reference Matthew 3:7 in Marathi 7 परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो दुष्ट सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?
Matthew 3:12 in Marathi 12 त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.
Matthew 12:45 in Marathi 45 नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.”
Matthew 21:41 in Marathi 41 यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.
Matthew 22:6 in Marathi 6 काहीनी नोकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले.
Matthew 23:32 in Marathi 32 पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.
Matthew 24:6 in Marathi 6 तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.
Matthew 24:14 in Marathi 14 सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल. आणि मग शेवट होईल.
Matthew 24:21 in Marathi 21 कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्या काळी येतील.
Mark 16:16 in Marathi 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
Luke 11:50 in Marathi 50 तर, भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल.
Luke 19:42 in Marathi 42 ' कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.
Luke 21:20 in Marathi 20 तुम्ही जेव्हा यरूशलेमेस सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हाला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
Acts 4:12 in Marathi 12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही,कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
Acts 11:2 in Marathi 2 पण जेव्हा पेत्र यरूशलेमेला आला, तेव्हा सुंता झालेला गट त्याच्यावर टिका करू लागले.
Acts 11:17 in Marathi 17 आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले. मग देवाला अडविणारा असा मी कोण?”
Acts 13:45 in Marathi 45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुध्द वाद उपस्थित केला.
Acts 13:50 in Marathi 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुध्द अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
Acts 14:2 in Marathi 2 परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहूदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.
Acts 14:5 in Marathi 5 काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
Acts 14:19 in Marathi 19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
Acts 17:5 in Marathi 5 परंतु यहूद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरांत घबराट निर्माण केली , आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोंकाकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली;
Acts 17:13 in Marathi 13 तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहुदयांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले.
Acts 18:12 in Marathi 12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुध्द एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले.
Acts 19:9 in Marathi 9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले, व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.
Acts 21:27 in Marathi 27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले.
Acts 22:21 in Marathi 21 तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.
Romans 10:13 in Marathi 13 ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
Galatians 5:11 in Marathi 11 आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 3:13 in Marathi 13 “म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही माघार घेऊ नये. कारण हे क्लेश आमचे गौरव आहेत.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
2 Thessalonians 2:10 in Marathi 10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांंनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अदभूते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
1 Timothy 2:4 in Marathi 4 त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
Hebrews 6:8 in Marathi 8 पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिती असते; तिचा अग्नीने नाश होईल.
Hebrews 10:27 in Marathi 27 पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.
James 5:1 in Marathi 1 धनवान लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
Revelation 22:11 in Marathi 11 जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे. ”