Cross Reference John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
John 14:15 in Marathi 15 माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
John 14:21 in Marathi 21 ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन.”
John 15:10 in Marathi 10 जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल.
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 3:19 in Marathi 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत,
Acts 10:31 in Marathi 31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो.
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
Romans 8:24 in Marathi 24 कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशा ही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?
Romans 12:12 in Marathi 12 आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
Romans 15:4 in Marathi 4 कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
Romans 16:6 in Marathi 6 मरियेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत;
Romans 16:26 in Marathi 26 पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे,
1 Corinthians 13:4 in Marathi 4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
1 Corinthians 13:13 in Marathi 13 सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतातः पण यात प्रीती श्रेष्ठ आहे.
1 Corinthians 15:58 in Marathi 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
2 Corinthians 2:17 in Marathi 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
2 Corinthians 5:14 in Marathi 14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरते. कारण आम्ही असे मानतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले,
2 Corinthians 8:7 in Marathi 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे.
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Galatians 5:6 in Marathi 6 ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही; आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
Galatians 5:13 in Marathi 13 कारण बंधूंनो, तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.
Galatians 6:9 in Marathi 9 आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू.
1 Thessalonians 2:13 in Marathi 13 ह्या कारणांमुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
1 Thessalonians 3:6 in Marathi 6 आता तीमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहो तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयीची वार्ता आम्हाकडे आणली;
2 Thessalonians 1:3 in Marathi 3 बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे,आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
2 Thessalonians 1:11 in Marathi 11 ह्याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या ह्या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
1 Timothy 2:3 in Marathi 3 कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
2 Timothy 1:3 in Marathi 3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुध्द विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
Philemon 1:5 in Marathi 5 कारण प्रभू येशूवर आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे व तुझा जो विश्वास आहे, त्यांविषयी मी एेकतो.
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 6:10 in Marathi 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
Hebrews 6:15 in Marathi 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
Hebrews 10:36 in Marathi 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हाला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.
Hebrews 11:7 in Marathi 7 विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्याला सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्र्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्वाचा तो वारीस झाला.
Hebrews 11:17 in Marathi 17 विश्वासाने, अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता इसहाकाला अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाला अर्पण करीत होता.
Hebrews 11:24 in Marathi 24 मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले.
Hebrews 13:21 in Marathi 21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.
James 1:3 in Marathi 3 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
James 2:17 in Marathi 17 म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
James 5:7 in Marathi 7 यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
1 Peter 3:4 in Marathi 4 पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.
1 John 3:3 in Marathi 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो
1 John 3:18 in Marathi 18 प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
1 John 3:21 in Marathi 21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हाला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हाला धैर्य आहे.
1 John 5:3 in Marathi 3 देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.
Revelation 2:2 in Marathi 2 “तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम,कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
Revelation 2:19 in Marathi 19 “मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे. आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे.
Revelation 3:10 in Marathi 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हाला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.