1 Peter 4:13 in Marathi 13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे.
Other Translations King James Version (KJV) But rejoice, inasmuch as ye are partakers of Christ's sufferings; that, when his glory shall be revealed, ye may be glad also with exceeding joy.
American Standard Version (ASV) but insomuch as ye are partakers of Christ's sufferings, rejoice; that at the revelation of his glory also ye may rejoice with exceeding joy.
Bible in Basic English (BBE) But be glad that you are given a part in the pains of Christ; so that at the revelation of his glory you may have great joy.
Darby English Bible (DBY) but as ye have share in the sufferings of Christ, rejoice, that in the revelation of his glory also ye may rejoice with exultation.
World English Bible (WEB) But because you are partakers of Christ's sufferings, rejoice; that at the revelation of his glory also you may rejoice with exceeding joy.
Young's Literal Translation (YLT) but, according as ye have fellowship with the sufferings of the Christ, rejoice ye, that also in the revelation of his glory ye may rejoice -- exulting;
Cross Reference Matthew 5:12 in Marathi 12 आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्याचा त्यांनी तसाच छळ केला.
Matthew 16:27 in Marathi 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
Matthew 25:21 in Marathi 21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
Matthew 25:23 in Marathi 23 “मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि विश्वासू दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Matthew 25:34 in Marathi 34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.
Mark 8:38 in Marathi 38 या देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
Luke 6:22 in Marathi 22 'जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील, आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल.
Luke 17:30 in Marathi 30 मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असेच घडेल
Acts 5:41 in Marathi 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
Acts 16:25 in Marathi 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.
2 Corinthians 1:7 in Marathi 7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे; कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहा तसेच सांत्वनाचेहि भागीदार आहा.
2 Corinthians 4:10 in Marathi 10 आम्ही निरंतर आमच्या शरिरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरिरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
2 Corinthians 4:17 in Marathi 17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
2 Corinthians 12:9 in Marathi 9 आणि त्याने मला म्हटले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;
Philippians 3:10 in Marathi 10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
2 Thessalonians 1:7 in Marathi 7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देव दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
2 Timothy 2:12 in Marathi 12 जर आम्ही दुःखसहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुध्दा करू जर आम्ही त्याला नाकारले, तर तोही आम्हाला नाकारील
James 1:2 in Marathi 2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
1 Peter 1:5 in Marathi 5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.
1 Peter 1:13 in Marathi 13 म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा; आणि, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
Revelation 1:7 in Marathi 7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.