1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
Other Translations King James Version (KJV) For Christ also hath once suffered for sins, the just for the unjust, that he might bring us to God, being put to death in the flesh, but quickened by the Spirit:
American Standard Version (ASV) Because Christ also suffered for sins once, the righteous for the unrighteous, that he might bring us to God; being put to death in the flesh, but made alive in the spirit;
Bible in Basic English (BBE) Because Christ once went through pain for sins, the upright one taking the place of sinners, so that through him we might come back to God; being put to death in the flesh, but given life in the Spirit;
Darby English Bible (DBY) for Christ indeed has once suffered for sins, [the] just for [the] unjust, that he might bring us to God; being put to death in flesh, but made alive in [the] Spirit,
World English Bible (WEB) Because Christ also suffered for sins once, the righteous for the unrighteous, that he might bring you to God; being put to death in the flesh, but made alive in the spirit;
Young's Literal Translation (YLT) because also Christ once for sin did suffer -- righteous for unrighteous -- that he might lead us to God, having been put to death indeed, in the flesh, and having been made alive in the spirit,
Cross Reference Matthew 27:19 in Marathi 19 तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नांत मला आज दिवसभर फार दुःख सहन करावे लागले आहे.
Matthew 27:24 in Marathi 24 लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले.पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “ह्या नीतिमान माणसाच्या रक्ताविषयी मी निर्दाेष आहे. तुमचे तुम्हीच पहा.
Acts 3:14 in Marathi 14 तुम्ही तर जो पवित्र व न्यायी त्याला नाकारले, आणि घातक माणूस आम्हाला द्यावा, असे मागितले;
Acts 22:14 in Marathi 14 मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
Romans 1:4 in Marathi 4 व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे, मेलेल्यातून पुन्हा उठण्याने, तो सामर्थ्याने, देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
Romans 4:25 in Marathi 25 तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे.
Romans 5:2 in Marathi 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Romans 5:6 in Marathi 6 कारण, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मेला.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 8:11 in Marathi 11 पण ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्या, आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमचीही मर्त्य शरिरे जिवंत करील.
2 Corinthians 1:24 in Marathi 24 आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही, पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत; कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
2 Corinthians 13:4 in Marathi 4 कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे. कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Galatians 3:13 in Marathi 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला.आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’,असा शास्त्रलेख आहे.
Ephesians 2:16 in Marathi 16 त्याने वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात त्या दोघांचा देवाबरोबर समेट करावा.
Colossians 1:21 in Marathi 21 आणि तुम्ही जे एकदा परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Hebrews 9:26 in Marathi 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे
Hebrews 9:28 in Marathi 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याच्या तारणाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
James 5:6 in Marathi 6 जे लोक तुम्हाला काहीही विरोध करीत नाही अशा नीतिमान लोकांना तुम्ही दोषी ठरवले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.
1 Peter 2:21 in Marathi 21 कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
1 Peter 4:6 in Marathi 6 कारण, ह्याकरता, मृतांनादेखील सुवार्ता सांगण्यात आली होती; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
1 John 1:9 in Marathi 9 जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे.म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील.