1 Peter 2:24 in Marathi 24 त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, हयासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.
Other Translations King James Version (KJV) Who his own self bare our sins in his own body on the tree, that we, being dead to sins, should live unto righteousness: by whose stripes ye were healed.
American Standard Version (ASV) who his own self bare our sins in his body upon the tree, that we, having died unto sins, might live unto righteousness; by whose stripes ye were healed.
Bible in Basic English (BBE) He took our sins on himself, giving his body to be nailed on the tree, so that we, being dead to sin, might have a new life in righteousness, and by his wounds we have been made well.
Darby English Bible (DBY) who himself bore our sins in his body on the tree, in order that, being dead to sins, we may live to righteousness: by whose stripes ye have been healed.
World English Bible (WEB) who his own self bore our sins in his body on the tree, that we, having died to sins, might live to righteousness; by whose stripes you were healed.
Young's Literal Translation (YLT) who our sins himself did bear in his body, upon the tree, that to the sins having died, to the righteousness we may live; by whose stripes ye were healed,
Cross Reference Matthew 5:20 in Marathi 20 मी तुम्हाला सांगतो, नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी ह्यांच्यापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.
Matthew 8:17 in Marathi 17 त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,’ असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
Matthew 27:26 in Marathi 26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्याला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्या हाती सोपवून दिले.
Luke 1:74 in Marathi 74 ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रुंच्या हातून सुटून
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
John 1:29 in Marathi 29 दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येतांना पाहून योहन म्हणाला, “हा, पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
John 19:1 in Marathi 1 नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले.
Acts 5:30 in Marathi 30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले;
Acts 10:35 in Marathi 35 प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ति करतो आणि योग्य ते करतो, त्याला देव स्वीकारतो, व्यक्ति कोणत्या देशाची आहे, हे महत्वाचे नाही.
Acts 10:39 in Marathi 39 येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेमेत जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला टांगून मारले.
Acts 13:29 in Marathi 29 शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले.
Romans 6:2 in Marathi 2 कधीच नाही!आपण जे पापाला मेलोत, ते त्यात ह्यापुढे, कसे राहणार?
Romans 6:7 in Marathi 7 कारण जो मेला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे.
Romans 6:11 in Marathi 11 तसेच, आपण ख्रिस्त येशूत खरोखर पापाला मेलेले, पण देवाला जिवंत आहोत, असे तुम्ही स्वतःला माना.
Romans 6:13 in Marathi 13 आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
Romans 6:16 in Marathi 16 तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहा. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय?
Romans 6:22 in Marathi 22 पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हाला पवित्रीकरण हे फळ आहे, आणि शेवट सार्वकालिक जीवन आहे.
Romans 7:6 in Marathi 6 पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्याला आपण मेलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
2 Corinthians 6:17 in Marathi 17 आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुध्दाला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्विकारीन.
Galatians 3:13 in Marathi 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला.आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’,असा शास्त्रलेख आहे.
Ephesians 5:9 in Marathi 9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्व, आणि सत्यात दिसून येतात.
Philippians 1:11 in Marathi 11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या व्दारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे.
Colossians 2:20 in Marathi 20 म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का हाेता?
Colossians 3:3 in Marathi 3 कारण तुम्ही मृत झला आहा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलें आहे.
Hebrews 7:26 in Marathi 26 म्हणून अगदी असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुध्द आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
Hebrews 9:28 in Marathi 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याच्या तारणाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
Hebrews 12:13 in Marathi 13 तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.
James 5:16 in Marathi 16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
1 John 2:29 in Marathi 29 जर तुम्हाला माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.
1 John 3:7 in Marathi 7 प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराहि न्यायसंपन्न आहे.