1 Peter 2:23 in Marathi 23 त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण जो नीतीने न्याय करतो त्याच्यावर त्याने स्वतःस सोपवले.
Other Translations King James Version (KJV) Who, when he was reviled, reviled not again; when he suffered, he threatened not; but committed himself to him that judgeth righteously:
American Standard Version (ASV) who, when he was reviled, reviled not again; when he suffered threatened not; but committed `himself' to him that judgeth righteously:
Bible in Basic English (BBE) To sharp words he gave no sharp answer; when he was undergoing pain, no angry word came from his lips; but he put himself into the hands of the judge of righteousness:
Darby English Bible (DBY) who, [when] reviled, reviled not again; [when] suffering, threatened not; but gave [himself] over into the hands of him who judges righteously;
World English Bible (WEB) Who, when he was cursed, didn't curse back. When he suffered, didn't threaten, but committed himself to him who judges righteously;
Young's Literal Translation (YLT) who being reviled -- was not reviling again, suffering -- was not threatening, and was committing himself to Him who is judging righteously,
Cross Reference Matthew 27:39 in Marathi 39 जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून
Mark 14:60 in Marathi 60 नंतर प्रमुख याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुध्द आरोप करताहेत हे कसे?”
Mark 15:29 in Marathi 29 जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, ‘अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!
Luke 22:64 in Marathi 64 त्यांनी त्याचे डोळे बांधले, व त्याला प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”
Luke 23:9 in Marathi 9 त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्याला उत्तर दिले नाही.
Luke 23:34 in Marathi 34 नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
Luke 23:46 in Marathi 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, 'पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.'असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
John 8:48 in Marathi 48 यहूद्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”
John 19:9 in Marathi 9 आणि तो पुन्हा सरकारवाड्यांत जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही.
Acts 4:29 in Marathi 29 तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा, आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे;
Acts 7:59 in Marathi 59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
Acts 8:32 in Marathi 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होताः “वधावयला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही.
Acts 9:1 in Marathi 1 शौल यरूशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकाकडे गेला.
Acts 17:31 in Marathi 31 त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याव्दारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटविले आहे.
Romans 2:5 in Marathi 5 पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
Ephesians 6:9 in Marathi 9 आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हाला हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
Hebrews 12:3 in Marathi 3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 Peter 4:19 in Marathi 19 म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्या हाती आपले जीव सोपवावेत.
Revelation 19:11 in Marathi 11 तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला, आणि पाहा, एक पांढरा घोडा, आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव ’विश्वासू आणि खरा’ आहे. तो नीतीने न्याय करतो, आणि युध्द करतो.