1 Peter 2:21 in Marathi 21 कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे.
Other Translations King James Version (KJV) For even hereunto were ye called: because Christ also suffered for us, leaving us an example, that ye should follow his steps:
American Standard Version (ASV) For hereunto were ye called: because Christ also suffered for you, leaving you an example, that ye should follow his steps:
Bible in Basic English (BBE) This is God's purpose for you: because Jesus himself underwent punishment for you, giving you an example, so that you might go in his footsteps:
Darby English Bible (DBY) For to this have ye been called; for Christ also has suffered for you, leaving you a model that ye should follow in his steps:
World English Bible (WEB) For to this you were called, because Christ also suffered for us, leaving you{TR reads "us" instead of "you"} an example, that you should follow his steps,
Young's Literal Translation (YLT) for to this ye were called, because Christ also did suffer for you, leaving to you an example, that ye may follow his steps,
Cross Reference Matthew 10:38 in Marathi 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
Matthew 11:29 in Marathi 29 माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
Matthew 16:24 in Marathi 24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Mark 8:34 in Marathi 34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे.
Luke 9:23 in Marathi 23 आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतः:ला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे.
Luke 14:26 in Marathi 26 जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतः:च्या जिवाचासुध्दा व्देष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
John 13:15 in Marathi 15 “कारण मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालू दिला आहे.
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
Acts 9:16 in Marathi 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Acts 17:3 in Marathi 3 त्यांने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे.
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
1 Corinthians 11:1 in Marathi 1 मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Philippians 2:5 in Marathi 5 अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीहि असो.
1 Thessalonians 3:3 in Marathi 3 तो असा की, ह्या संकटांत कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहा.
1 Thessalonians 4:2 in Marathi 2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.
2 Timothy 3:12 in Marathi 12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुध्द जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
Hebrews 2:10 in Marathi 10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने त्याला त्याच्या दुःखसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
1 Peter 2:24 in Marathi 24 त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, हयासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
1 John 2:6 in Marathi 6 मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशूख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
1 John 3:16 in Marathi 16 ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
Revelation 12:11 in Marathi 11 त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.