1 Peter 2:12 in Marathi 12 आणि, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
Other Translations King James Version (KJV) Having your conversation honest among the Gentiles: that, whereas they speak against you as evildoers, they may by your good works, which they shall behold, glorify God in the day of visitation.
American Standard Version (ASV) having your behavior seemly among the Gentiles; that, wherein they speak against you as evil-doers, they may by your good works, which they behold, glorify God in the day of visitation.
Bible in Basic English (BBE) Being of good behaviour among the Gentiles; so that though they say now that you are evil-doers, they may see your good works and give glory to God when he comes to be their judge.
Darby English Bible (DBY) having your conversation honest among the Gentiles, that [as to that] in which they speak against you as evildoers, they may through [your] good works, [themselves] witnessing [them], glorify God in [the] day of visitation.
World English Bible (WEB) having good behavior among the nations, so in that which they speak against you as evil-doers, they may by your good works, which they see, glorify God in the day of visitation.
Young's Literal Translation (YLT) having your behaviour among the nations right, that in that which they speak against you as evil-doers, of the good works having beheld, they may glorify God in a day of inspection.
Cross Reference Matthew 5:11 in Marathi 11 माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरूध्द सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात.
Matthew 5:16 in Marathi 16 तशाच प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्यासाठी प्रकाश असे झाले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
Matthew 9:8 in Marathi 8 हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
Matthew 10:25 in Marathi 25 शिष्य आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.
Luke 1:68 in Marathi 68 'इस्राएलाचा देव प्रभू', हयाची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांना सोडविण्यासाठी मार्ग तयार केला.
Luke 6:22 in Marathi 22 'जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील, आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल.
Luke 19:44 in Marathi 44 ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील. व दगडावर दगड राहू देणार नाही. कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.'
Acts 15:14 in Marathi 14 परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली , हे शिमोनाने सांगितले आहे;आणि हयाच्याशी संदेष्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,
Acts 24:5 in Marathi 5 हा माणूस म्हणजे एक पिडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
Acts 24:13 in Marathi 13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.
Acts 25:7 in Marathi 7 तो आल्यावर यरूशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
Romans 12:17 in Marathi 17 वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.
Romans 13:13 in Marathi 13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.
Romans 15:9 in Marathi 9 आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे. कारण असे लिहिले आहे की, ‘म्हणून, मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
1 Corinthians 14:25 in Marathi 25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी
2 Corinthians 1:12 in Marathi 12 आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण,म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुध्दीची साक्ष होय.आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
2 Corinthians 8:21 in Marathi 21 अाम्ही 'प्रभूच्या दृष्टीने जे मान्य', इतकेच नव्हे तर 'मनुष्यांच्याही' दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.
2 Corinthians 13:7 in Marathi 7 आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नाही, पण आम्ही पसंतीस न उतरलेले असलो तरी तुम्ही चांगले ते करावे.
Ephesians 2:3 in Marathi 3 “ आम्ही सर्व यापूर्वी ह्या अविश्वासणाऱ्या मध्ये आपल्या शारीरीक दुष्टवासनेने वागत होतो, दैहिक आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो, व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची मुले होतो.
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 2:15 in Marathi 15 ह्यासाठी की,ह्या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे;
Philippians 4:8 in Marathi 8 बंधूंनो,शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुध्द आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांवर विचार करा.
1 Thessalonians 4:12 in Marathi 12 बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे, आणि तुम्हास कशाचीहि गरज पडू नये म्हणून,
1 Timothy 2:2 in Marathi 2 आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्यां सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Hebrews 13:5 in Marathi 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे. “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”
Hebrews 13:18 in Marathi 18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेकबुद्धी शुध्द आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत राहावे अशी आमची इच्छा आहे.
James 3:13 in Marathi 13 तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
1 Peter 3:1 in Marathi 1 आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. कारण ते तुमचे शुध्द, आदराचे आचरण पाहतील.
1 Peter 3:16 in Marathi 16 आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्यांना लाज वाटावी.
1 Peter 4:11 in Marathi 11 जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्याला गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
1 Peter 4:14 in Marathi 14 ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहा .कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहीला आहे.
2 Peter 3:11 in Marathi 11 ह्या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?