1 Peter 2:11 in Marathi 11 माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्या दैहिक वासनांपासून दूर रहा.
Other Translations King James Version (KJV) Dearly beloved, I beseech you as strangers and pilgrims, abstain from fleshly lusts, which war against the soul;
American Standard Version (ASV) Beloved, I beseech you as sojourners and pilgrims, to abstain from fleshly lust, which war against the soul;
Bible in Basic English (BBE) My loved ones, I make this request with all my heart, that, as those for whom this world is a strange country, you will keep yourselves from the desires of the flesh which make war against the soul;
Darby English Bible (DBY) Beloved, I exhort [you], as strangers and sojourners, to abstain from fleshly lusts, which war against the soul;
World English Bible (WEB) Beloved, I beg you as foreigners and pilgrims, to abstain from fleshly lusts, which war against the soul;
Young's Literal Translation (YLT) Beloved, I call upon `you', as strangers and sojourners, to keep from the fleshly desires, that war against the soul,
Cross Reference Luke 21:34 in Marathi 34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व ह्या हल्लीच्या आयुष्यासंबंधीच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
Acts 15:20 in Marathi 20 तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण , जारकर्म , गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांच्यापासुन तुम्ही अलिप्त असा
Acts 15:29 in Marathi 29 त्या म्हणजे मुर्तीला अर्पीलेले पदार्थ, रक्त, गळा दाबुन मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी ; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेंमकुशल असो.
Romans 7:23 in Marathi 23 पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
Romans 8:13 in Marathi 13 कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 13:13 in Marathi 13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.
2 Corinthians 5:20 in Marathi 20 तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हाला आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 Corinthians 7:1 in Marathi 1 प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुध्देपासून स्वतःला शुध्द करू, आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
Galatians 5:16 in Marathi 16 म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही.
Galatians 5:24 in Marathi 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.
Ephesians 4:1 in Marathi 1 “म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा. “
1 Timothy 6:9 in Marathi 9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
2 Timothy 2:22 in Marathi 22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुध्द अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग.
Philemon 1:9 in Marathi 9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृध्द झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
Hebrews 11:13 in Marathi 13 हे सगळे विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण 'पृथ्वीवर परके आणि प्रवासी' आहोत.
James 4:1 in Marathi 1 तुमच्यात लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
1 Peter 1:17 in Marathi 17 आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्याला तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहीजे.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
1 John 2:15 in Marathi 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.