1 John 3:14 in Marathi 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो.
Other Translations King James Version (KJV) We know that we have passed from death unto life, because we love the brethren. He that loveth not his brother abideth in death.
American Standard Version (ASV) We know that we have passed out of death into life, because we love the brethren. He that loveth not abideth in death.
Bible in Basic English (BBE) We are conscious that we have come out of death into life because of our love for the brothers. He who has no love is still in death.
Darby English Bible (DBY) *We* know that we have passed from death to life, because we love the brethren. He who does not love [his] brother abides in death.
World English Bible (WEB) We know that we have passed out of death into life, because we love the brothers. He who doesn't love his brother remains in death.
Young's Literal Translation (YLT) we -- we have known that we have passed out of the death to the life, because we love the brethren; he who is not loving the brother doth remain in the death.
Cross Reference Matthew 25:40 in Marathi 40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
Luke 15:24 in Marathi 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करू लागले.
Luke 15:32 in Marathi 32 परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 13:35 in Marathi 35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हमजे ह्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”
John 15:12 in Marathi 12 जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.
John 15:17 in Marathi 17 तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो.
2 Corinthians 5:1 in Marathi 1 कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हाला देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Ephesians 1:15 in Marathi 15 यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि पवित्र जनांवरील तुमच्या प्रीतीविषयी ही ऐकले,
Ephesians 2:1 in Marathi 1 “आणि तुम्ही आपले अपराध आणि पातके यामुळे मेला होता. “
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Colossians 1:4 in Marathi 4 कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी, आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
1 Thessalonians 4:9 in Marathi 9 बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे ह्याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी,असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे;
Hebrews 6:10 in Marathi 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
Hebrews 13:1 in Marathi 1 ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीती करा.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
1 Peter 3:8 in Marathi 8 शेवटी सर्व जण एकमनाचे व्हा; आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
2 Peter 1:7 in Marathi 7 सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.
1 John 2:3 in Marathi 3 जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्याला खऱ्या अर्थाने ओळखले आहे.
1 John 2:9 in Marathi 9 मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा व्देष करतो तो अजून अंधारांतच आहे.
1 John 3:23 in Marathi 23 तो आम्हाला अशी आज्ञा आहे की,त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
1 John 4:7 in Marathi 7 प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला आेळखतो.
1 John 4:12 in Marathi 12 देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते.
1 John 4:20 in Marathi 20 “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.
1 John 5:2 in Marathi 2 देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने.आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
1 John 5:13 in Marathi 13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.