1 John 2:1 in Marathi 1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हापैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.
Other Translations King James Version (KJV) My little children, these things write I unto you, that ye sin not. And if any man sin, we have an advocate with the Father, Jesus Christ the righteous:
American Standard Version (ASV) My little children, these things write I unto you that ye may not sin. And if any man sin, we have an Advocate with the Father, Jesus Christ the righteous:
Bible in Basic English (BBE) My little children, I am writing these things to you so that you may be without sin. And if any man is a sinner, we have a friend and helper with the Father, Jesus Christ, the upright one:
Darby English Bible (DBY) My children, these things I write to you in order that ye may not sin; and if any one sin, we have a patron with the Father, Jesus Christ [the] righteous;
World English Bible (WEB) My little children, I write these things to you so that you may not sin. If anyone sins, we have a Counselor{Greek Parakleton: Counselor, Helper, Intercessor, Advocate, and Comfortor.} with the Father, Jesus Christ, the righteous.
Young's Literal Translation (YLT) My little children, these things I write to you, that ye may not sin: and if any one may sin, an advocate we have with the Father, Jesus Christ, a righteous one,
Cross Reference Luke 10:22 in Marathi 22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.
John 5:14 in Marathi 14 त्यानंतर तो येशूला मंदिरात भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
John 5:19 in Marathi 19 ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून कांहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
John 5:36 in Marathi 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिध्दीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
John 8:11 in Marathi 11 ती म्हणाली, “ प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी पण तुला दोषी ठरवीत नाही; जा, ह्यापुढे पाप करू नको.”
John 13:33 in Marathi 33 मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहुद्यांना सांगितले की,‘मी जाईन तिकडे तुम्हाला येता येणार नाही.’तसे तुम्हासही आता सांगतो.
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 21:5 in Marathi 5 तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्याला म्हणाले, “नाही.”
Romans 6:1 in Marathi 1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय?
Romans 6:15 in Marathi 15 मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली आणले गेलो नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही.
Romans 8:34 in Marathi 34 दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
1 Corinthians 4:14 in Marathi 14 मी तुम्हाला हे लाजविण्यासाठी लिहित नाहीः तर उलट मी तुम्हाला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतो,
1 Corinthians 15:34 in Marathi 34 नीतीमत्वा संबंधाने शुध्दीवर या आणि पाप करीत जाऊ नका. कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
Galatians 4:19 in Marathi 19 माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीवेदना होत आहेत.
Ephesians 2:18 in Marathi 18 “ कारण येशूच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्यात पित्याजवळ प्रवेश होतो.
Ephesians 4:26 in Marathi 26 तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.
1 Timothy 2:5 in Marathi 5 कारण फक्त एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
1 Timothy 3:14 in Marathi 14 मी तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहिल्या आहे.
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Hebrews 7:24 in Marathi 24 त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो युगानुयुग' राहतो.
Hebrews 9:24 in Marathi 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
James 1:27 in Marathi 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुध्द व निर्दोष ठरते.
James 3:9 in Marathi 9 आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो.
1 Peter 1:15 in Marathi 15 परंतु तुम्हाला ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
1 Peter 2:22 in Marathi 22 त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
1 John 1:3 in Marathi 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
1 John 1:8 in Marathi 8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.
1 John 2:12 in Marathi 12 प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झालेली आहे.
1 John 2:28 in Marathi 28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हाला धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
1 John 3:7 in Marathi 7 प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराहि न्यायसंपन्न आहे.
1 John 3:18 in Marathi 18 प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
1 John 4:4 in Marathi 4 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
1 John 5:21 in Marathi 21 माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.