1 John 1:3 in Marathi 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
Other Translations King James Version (KJV) That which we have seen and heard declare we unto you, that ye also may have fellowship with us: and truly our fellowship is with the Father, and with his Son Jesus Christ.
American Standard Version (ASV) that which we have seen and heard declare we unto you also, that ye also may have fellowship with us: yea, and our fellowship is with the Father, and with his Son Jesus Christ:
Bible in Basic English (BBE) We give you word of all we have seen and everything which has come to our ears, so that you may be united with us; and we are united with the Father and with his Son Jesus Christ:
Darby English Bible (DBY) that which we have seen and heard we report to you, that *ye* also may have fellowship with us; and our fellowship [is] indeed with the Father, and with his Son Jesus Christ.
World English Bible (WEB) that which we have seen and heard we declare to you, that you also may have fellowship with us. Yes, and our fellowship is with the Father, and with his Son, Jesus Christ.
Young's Literal Translation (YLT) that which we have seen and heard declare we to you, that ye also may have fellowship with us, and our fellowship `is' with the Father, and with His Son Jesus Christ;
Cross Reference John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:11 in Marathi 11 आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
John 17:25 in Marathi 25 हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे .
Acts 2:42 in Marathi 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
Acts 4:20 in Marathi 20 कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हाला शक्य नाही.
Acts 13:32 in Marathi 32 आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
Acts 13:41 in Marathi 41 अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा,आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Romans 15:27 in Marathi 27 हे खरोखर त्यांना बरे वाटले; आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण त्यांच्या आत्मिक गोष्टींत जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत, तर दैहिक गोष्टींत त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
1 Corinthians 1:9 in Marathi 9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागीतेत तुम्हाला बोलावले होते, तो देव विश्वासू आहे.
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
1 Corinthians 15:1 in Marathi 1 आता बंधूंनो मी तुम्हाला आठवण करून देतो, की जी सुवार्ता मी तुम्हाला गाजवली व जी तुम्ही स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही स्थिरही आहात.
2 Corinthians 13:14 in Marathi 14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Ephesians 3:6 in Marathi 6 हे रहस्य ते आहे की,येशू ख्रिस्तामध्ये सुवार्तेद्वारे परराष्ट्रीय हे यहूदी लोकांबरोबर वारसदार आणि ते एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि अभिवचनाचे भागीदार आहेत.”
Philippians 1:7 in Marathi 7 आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हाला बाळगून आहे.
Philippians 2:1 in Marathi 1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता,काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
Philippians 3:10 in Marathi 10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.
Colossians 1:13 in Marathi 13 त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
1 Timothy 6:2 in Marathi 2 आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे, कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत ह्या गोष्टी शिकवून बोध कर.
Hebrews 2:12 in Marathi 12 तो म्हणतो, “मी तुझे नाव माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.”
Hebrews 3:1 in Marathi 1 म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहो, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा प्रमुख याजक आहे.
Hebrews 3:14 in Marathi 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
1 John 1:5 in Marathi 5 जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे आणि तोच तुम्हाला घोषित करीत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.
1 John 1:7 in Marathi 7 पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
1 John 2:23 in Marathi 23 जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभत नाही, पण जो पुत्राला स्विकारतो त्याला पिता लाभला अाहे.
1 John 5:10 in Marathi 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.