1 Corinthians 8:6 in Marathi 6 परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.
Other Translations King James Version (KJV) But to us there is but one God, the Father, of whom are all things, and we in him; and one Lord Jesus Christ, by whom are all things, and we by him.
American Standard Version (ASV) yet to us there is one God, the Father, of whom are all things, and we unto him; and one Lord, Jesus Christ, through whom are all things, and we through him.
Bible in Basic English (BBE) There is for us only one God, the Father, of whom are all things, and we are for him; and one Lord, Jesus Christ, through whom are all things, and we have our being through him.
Darby English Bible (DBY) yet to us [there is] one God, the Father, of whom all things, and *we* for him; and one Lord, Jesus Christ, by whom [are] all things, and *we* by him.
World English Bible (WEB) yet to us there is one God, the Father, of whom are all things, and we for him; and one Lord, Jesus Christ, through whom are all things, and we live through him.
Young's Literal Translation (YLT) yet to us `is' one God, the Father, of whom `are' the all things, and we to Him; and one Lord, Jesus Christ, through whom `are' the all things, and we through Him;
Cross Reference Matthew 11:27 in Marathi 27 “माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
John 1:3 in Marathi 3 सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावांचून झाले नाही.
John 5:20 in Marathi 20 कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे काही करतो ते त्याला दाखवतो. आणि तुम्ही आश्चर्य कराव म्हणून तो ह्याहून मोठी कामे त्याला दाखवील.
John 10:30 in Marathi 30 मी आणि पिता एक आहो.”
John 13:13 in Marathi 13 तुम्ही मला गुरू आणि प्रभू म्हणता, आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.
John 14:9 in Marathi 9 येशूने त्याला म्हटले, “ फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हाला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
John 20:17 in Marathi 17 येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’”
Acts 2:36 in Marathi 36 म्हणून इस्त्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Acts 17:28 in Marathi 28 कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो, व आहो तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहो.
Romans 11:36 in Marathi 36 कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
1 Corinthians 6:13 in Marathi 13 '' अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे”; पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण जारकर्मासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे .
1 Corinthians 8:4 in Marathi 4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही, आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
1 Corinthians 12:3 in Marathi 3 म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभू आहे,” असे म्हणू शकत नाही.
Ephesians 1:3 in Marathi 3 स्वर्गीय स्थानातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवाला व पित्याला धन्यवाद असोत.
Ephesians 1:20 in Marathi 20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
Ephesians 3:14 in Marathi 14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
Ephesians 4:5 in Marathi 5 एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,
Philippians 2:9 in Marathi 9 ह्यामुळे देवाने त्याला सर्वांहून उंच केले आहे. आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे.
Colossians 1:6 in Marathi 6 ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत, आणि तुम्हाला सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
Colossians 1:16 in Marathi 16 कारण, स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
1 Timothy 2:5 in Marathi 5 कारण फक्त एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
Hebrews 1:2 in Marathi 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
1 Peter 1:2 in Marathi 2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.
1 Peter 1:21 in Marathi 21 आणि त्याच्या द्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण, देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्याला मृतांतून उठवून गौरव दिला.
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.