1 Corinthians 5:11 in Marathi 11 पण आता, मी तुम्हाला लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, किंवा मूर्तिपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा माणसांबरोबर जेवूही नका.
Other Translations King James Version (KJV) But now I have written unto you not to keep company, if any man that is called a brother be a fornicator, or covetous, or an idolater, or a railer, or a drunkard, or an extortioner; with such an one no not to eat.
American Standard Version (ASV) but as it is, I wrote unto you not to keep company, if any man that is named a brother be a fornicator, or covetous, or an idolater, or a reviler, or a drunkard, or an extortioner; with such a one no, not to eat.
Bible in Basic English (BBE) But the sense of my letter was that if a brother had the name of being one who went after the desires of the flesh, or had the desire for other people's property, or was in the way of using violent language, or being the worse for drink, or took by force what was not his, you might not keep company with such a one, or take food with him.
Darby English Bible (DBY) But now I have written to you, if any one called brother be fornicator, or avaricious, or idolater, or abusive, or a drunkard, or rapacious, not to mix with [him]; with such a one not even to eat.
World English Bible (WEB) But as it is, I wrote to you not to associate with anyone who is called a brother who is a sexual sinner, or covetous, or an idolater, or a slanderer, or a drunkard, or an extortioner. Don't even eat with such a person.
Young's Literal Translation (YLT) and now, I did write to you not to keep company with `him', if any one, being named a brother, may be a whoremonger, or covetous, or an idolater, or a railer, or a drunkard, or an extortioner -- with such a one not even to eat together;
Cross Reference Matthew 18:17 in Marathi 17 जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीला ही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय, किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
Matthew 23:25 in Marathi 25 “अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत.
Matthew 24:49 in Marathi 49 तो नोकर इतर नोकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
Mark 7:21 in Marathi 21 कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून,
Luke 12:15 in Marathi 15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतः:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
Luke 12:45 in Marathi 45 पण जर तो नौकर मनात म्हणतो, “माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नौकरांना मारहाण करायला, व खाण्यापिण्यास सुरुवात करतो, व झिंगतो,
Luke 18:11 in Marathi 11 परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, 'हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही.
Luke 21:34 in Marathi 34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व ह्या हल्लीच्या आयुष्यासंबंधीच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
Acts 9:17 in Marathi 17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले,यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”
Romans 13:13 in Marathi 13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.
Romans 16:17 in Marathi 17 आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
1 Corinthians 5:1 in Marathi 1 मी अशी बातमी एेकली आहे की, तुमच्यामध्ये जारकर्म चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या बापाच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य परराष्ट्रीय लोकांमध्येही आढळणार नाही.
1 Corinthians 5:13 in Marathi 13 पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून “तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट माणसाला बाहेर काढा.”
1 Corinthians 6:6 in Marathi 6 पण एक भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे?
1 Corinthians 6:10 in Marathi 10 चोर, लोभी किंवा दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे, ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाहीत.
1 Corinthians 7:12 in Marathi 12 पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वासणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये.
1 Corinthians 7:15 in Marathi 15 पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण, कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे.
1 Corinthians 8:11 in Marathi 11 आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मेला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या ह्या ज्ञानामुळे नाश होतो.
1 Corinthians 10:7 in Marathi 7 त्यांच्यापैकी काही जण मूर्तिपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते दैहीकतेने नाच करण्यासाठी उठले.”
1 Corinthians 10:14 in Marathi 14 तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तिपूजा टाळा.
1 Corinthians 10:18 in Marathi 18 देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का?
1 Corinthians 11:21 in Marathi 21 कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो.
2 Corinthians 12:20 in Marathi 20 कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हाला आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध,स्वार्थी महत्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील.
Galatians 2:12 in Marathi 12 कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो परराष्ट्रीयांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकास भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला.
Galatians 5:19 in Marathi 19 आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः जारकर्म, अमंगळपणा, कामातुरपणा,
Ephesians 5:5 in Marathi 5 कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुध्द, किंवा लोभी म्हणजे मूर्तिपुजक आहे त्याला ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही.
Ephesians 5:18 in Marathi 18 आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट आत्म्याने पूर्णपणे भरले जा,
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
1 Thessalonians 4:3 in Marathi 3 कारण देवाची इच्छा ही आहे की,तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दुर राहावे
1 Thessalonians 5:7 in Marathi 7 झोप घेणारे रात्री झोप घेतात, अाणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
2 Thessalonians 3:6 in Marathi 6 बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या सप्रंदाया प्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
2 Thessalonians 3:14 in Marathi 14 ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरूं नका;
1 Timothy 3:3 in Marathi 3 तो मद्य पिणारा किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा तर तो सौम्य, न भांडणारा,पैशाचा लोभ न धरणारा.
1 Timothy 6:5 in Marathi 5 मन बिघडलेल्या, व खरेपण विरहित झालेल्या ,भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची सतत भांडणे होतात,त्यांच्या पासून दूर राहा.
1 Timothy 6:9 in Marathi 9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
2 John 1:10 in Marathi 10 हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका. किंवा त्याला सलामही करू नका.
Revelation 2:14 in Marathi 14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
Revelation 2:20 in Marathi 20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.
Revelation 21:8 in Marathi 8 पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय. ”
Revelation 22:15 in Marathi 15 परंतु ‘कुत्रे’ चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.